वर्धा : उभ्या ट्रकने घेतला पेट महामार्गावरील घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wardha truck fire at karanja highway

वर्धा : उभ्या ट्रकने घेतला पेट महामार्गावरील घटना

कारंजा : कारंजा घाटगे येथील राष्ट्रीय महामार्गावरील राजणी शिवारात शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रक क्र, MH-CD-3125 याला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती, या आगीत ट्रकमधील कोंबड्याचे खाद्य जळून खाक झाले. या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 2 लाख रुपयांचे खाद्य जळून खाक झाले, हा ट्रक मालेगाव येथून तिरोड्याला कोंबड्याचे खाद्य घेऊन निघाला होता.

चालक व क्लिनर जेवण्यासाठी राजनी जवळील संजू ढाबा येथे बसले होते, दरम्यान रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून ट्रकचालक शिवदास झुंगरुपोळी व क्लिनर राकेश मोरे दोघेही धुळे हे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले असताना काही क्षणातच ट्रकच्या समोरील कॅबिनला आग लागली. व त्या आगीत केबिन संपूर्ण जळून खाक झाली होती, आग कशामुळे लागली याची माहीती मिळू शकली नाही. चालकाने ट्रक कडे पाहिले असता उभा ट्रक जळताना आढळून आला.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ओरिएंटल पाथवेज येथून पाण्याचा टँकर तर आष्टी नगरपंचायत येथून अग्निशमन दल बोलावण्यात आला होता, मात्र तोपर्यंत ट्रकने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता या घटनेची कारंजा पोलिसात नोंद करण्यात आली आहे, रात्रीच्या अंधारात बरनिंग ट्रक पाहून परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, तर अनेकांनी या पेटत्या ट्रक चा व्हिडिओ मोबाईल मध्ये घेतला.

Web Title: Wardha Truck Fire At Karanja Highway Chicken Feed Burn In Incident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top