Virdha Lightning: सहा ठिकाणी लागणार लाईटनिंग अरेस्टर; वीज काेसळून ३१ जण ठार, २८१ जनावरे मृत्युमुखी
Lightning Arrester: वर्धा जिल्ह्यात पावसाळ्यात वीज कोसळून ३१ नागरिकांचा मृत्यू आणि २८१ जनावरे मृत्युमुखी. सहा ठिकाणी लाईटनिंग अरेस्टर बसवून भविष्यातील दुर्घटना टाळण्याचे प्रशासनाचे प्रयत्न.
वर्धा : मान्सून सुरू झाल्यापासून पावसासह वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांत जिल्ह्यातील विविध भागांत वीज कोसळून तब्बल ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.