

Amravati Accident
sakal
अमरावती : जिल्ह्यातील वरुड व शिरखेड ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात दोघे ठार झाले आहेत. वरुड तालुक्यातील टेंभूरखेडा व शिरखेडमध्ये या घटना घडल्या. वरुड ठाण्याच्या हद्दीत वरुड ते टेंभूरखेडा सातपुडा बारसमोर पांढऱ्या रंगाच्या एमएच १२ एचव्ही २१४४ क्रमांकाच्या वेगात येणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.