अरे व्वा! प्राण्यांसाठीही दररोजचा मेन्यू; लॉकडाउनमध्ये शमविली त्यांनी प्राण्यांची भूक 

Amravati.
Amravati.

अमरावती  : लॉकडाउनमध्ये रस्ते निर्मनुष्य आणि सगळीकडे शुकशुकाट होता. अशा परिस्थितीतही दोघा भावांनी "यस वी फीड' हा उपक्रम राबवित प्राण्यांची भूक शमविली. "वसा' संस्थेचे शुभम सायंके व भूषण सायंके हे ते दोघे भाऊ आहेत. 

रस्त्यावरील भटके बेवारस श्वान, मांजरी, गायी, डुक्कर, गाढव, घोडे यांना दोन महिने त्यांनी अन्न पुरविले. सोबतच संस्थेचे आठ सदस्य दररोज संपूर्ण अमरावती शहरात फिरून तब्बल 60 ते 70 प्राण्यांच्या जेवणाची आणि पाण्याची सोय करीत होते, तर इतर 52 सदस्य त्यांच्या घराजवळील बेवारस प्राण्यांना अन्नदान करीत बेवारस प्राण्यांना अंडी, भात, पोहे, पोळ्या, ताक आणि दही याबरोबर बिस्किटे, कॅट फूड, गव्हांडा आणि डॉग फूड असा वेगवेगळा मेन्यू दररोज ठरवून देण्यात आला. शहरातील प्राणीप्रेमींसह काही राज्यातून सुद्धा या उपक्रमासाठी आर्थिक मदत मिळाल्याचे सांगण्यात आले. 
"वसा'चे निखिल फुटाणे, मुकेश वाघमारे, रोहित रेवाळकर, भूषण हंगरे, भूषण सायंके, आकाश वानखडे, रोशन इंगळे, गणेश अकर्ते, सुशांत तंतरपाळे, अनिकेत सरोदे, नयन ठाकरे, गोपाल बारस्कर, शैलेश आखरे, निखिल गोस्वामी, सागर शृंगारे, अक्षय पांडे, मृणालिनी घरडे, पूनम वडगावकर, सागर फुटाणे, पंकज मालवे, मुकेश मालवे, अजिंक्‍य कराळे, कुणाल घोंगडे आणि शुभम सायंके हे शिलेदार आहेत. 

48 सापांचे रेस्क्‍यू 

शहरात तसेच ग्रामीण भागात लॉकडाउनदरम्यान तब्बल 48 सापांना "वसा'द्वारे रेस्क्‍यू करण्यात आले. विविध प्रजातींच्या सापांना मानव वस्तीमधून रेस्क्‍यू करून त्यांच्या मूळ अधिवासात मुक्त करण्यात आले. 

पक्ष्यांनाही जीवनदान 

कुलिंगडकमध्ये अडकलेल्या 8 जंगली कबुतरांना मंगलधाम परिसरातून वाचविण्यात आले. उडू न शकणाऱ्या गव्हाणी घुबडाला सुद्धा अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावरून रेस्क्‍यू करण्यात आले. शिकारी पक्ष्यांच्या झडपेत जखमी झालेल्या कबुतर, मैना यांच्यावर वैद्यकीय उपचार "वसा'ने केले. शॉक लागून जखमी झालेल्या कोकिळा, कावळा आणि पोपटाच्या रेस्क्‍यूनंतर त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात आला. 

टेक्‍निकल रेस्क्‍यू 

परलाम गावातील शेतानजीकच्या विहिरीत पडलेल्या जंगली मांजराला वसाच्या प्रशिक्षित रेस्क्‍यूअरने जीवदान दिले. उत्तमसरा गावातील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेल्या विहिरीत पडलेल्या साध्या मांजराला विहिरीत उतरून रेस्क्‍यू करण्यात आले. बोरगाव शेतशिवारात सकाळच्या वेळी भटक्‍या श्वानांनी काळविटाला पकडून जखमी केले. मात्र, या युवकांनी काळविटीचा जीव वाचवून त्याला वनविभागाच्या स्वाधीन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com