Washim : वाशीमची सूत्रे हालतात यवतमाळातून ; पालकमंत्र्यांचे जनसंपर्क कार्यालय झाले जिल्हा मुख्यालय

वाशीम जिल्हा आधीच मानव विकास निर्देशांकात तळाला आहे.
पालकमंत्री संजय राठोड
पालकमंत्री संजय राठोडsakal

वाशीम : लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधी जनसेवक व अधिकारी लोकांचे सेवक ही व्यवस्था अभिप्रेत असताना ज्यांच्याकडे वाशीमसारख्या आकांक्षीत जिल्ह्याचे पालकत्व आहे, त्या पालकमंत्र्यांनाच जिल्ह्यात फिरकायला वेळ नसल्याने लोकप्रतिनिधी राजा व प्रशासकीय अधिकारी निरंकुश सरदार अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील विविध योजनांचे लोकार्पण यवतमाळ येथील पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात उरकण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. पालकमंत्री संजय राठोड पोहरादेवी व्यतिरिक्त इतरत्र चार दोन भेटीचेच पालकमंत्री ठरले असून या जिल्ह्यात अनेक लोककल्याणकारी योजनांची वासलात लागत असल्याचे चित्र आहे.

वाशीम जिल्हा आधीच मानव विकास निर्देशांकात तळाला आहे. केंद्र सरकारने या जिल्ह्याला आकांक्षीत जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. आधीच विकासाच्या राजकीय इच्छाशक्तीत आकांक्षीत ठरलेल्या जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय राठोड यांच्या शिरावर दिली, मात्र ही जबाबदारी सुरूवातीपासूनच मंत्री संजय राठोड यांना ओझे झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

सुरुवातीला पोहरादेवी वगळता इतर ठिकाणी पालकमंत्री चारदोनवेळ केवळ धावत्या भेटीवर आले अन गेले. आता तर जिल्ह्यातील विकासाच्या योजनांच्या माहिती दस्ताऐवजांचे लोकार्पण करण्यासही पालकमंत्र्यांना वेळ नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यात सध्या सामाजिक न्याय पर्व सुरू आहे. या पर्वानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना व इतर योजनांची माहिती व्हावी, यासाठी व्हिडिओ जिंगल्स तयार केले होते. तसेच काही विद्यार्थ्यांना महाज्योती टॅबचेही वितरण नियोजित होते.

अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार निवारण कायद्याबाबत जनजागृतीसाठी माहिती विभागाने सलोखा पुस्तिका तयार केली, मात्र याचे अनावरण करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड जिल्ह्यात फिरकतच नसल्याने प्रशासनाला हेलपाटे घेत यवतमाळ गाठावे लागले. यवतमाळात पालकमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुस्तिका, जिंगल्सचे लोकार्पण व महाज्योतीकडून प्राप्त

टॅबचे वितरण कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील श्रीजय निंगोट आणि धनज (बु) येथील प्रद्युम्न बोरकर या इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. यासाठी या विद्यार्थ्यांनाही यवतमाळात पायपीट करावी लागली. वाशीम जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन दशक झाली असताना वाशीम जिल्ह्याच्या प्रशासनाला यवतमाळ जिल्ह्यात धाव घ्यावी लागत असेल तर एकतर जिल्हा बदला अन्यथा पालकमंत्री बदला अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

ना धाक ना नियोजन

पालकमंत्री संजय राठोड यांच्या पालकत्वाच्या काळात प्रशासन शिरजोर झाले आहे. जाब विचारणारे पालकमंत्रीच फिरकत नसल्याने कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही. अनेक कल्याणकारी समित्यांचे गठण झालेच नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांना वाशीमचे पालकत्व ओझे वाटत असेल तर त्यांनी ते झुगारून देऊन जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com