Washim : रिसोड आगाराचे ताळतंत्र बिघडले

नियमित बस फेऱ्या बंद, अवैध प्रवासी वाहतुकीला खतपाणी
washim
washimsakal

रिसोड : मागील काही दिवसापासून येथील आगाराचे तळतंत्र बिघडले असून वर्षानुवर्षे चालत असलेल्या नियमित बसलेल्या बंद तर ग्रामीण भागातील बस फेऱ्या अनियमित असल्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही गाड्या बंद तर काही बस फेऱ्या अनियमित असल्यामुळे अवैध वाहतूकदारांची चांदी होत आहे.

मागील किती वर्षापासून नियमित चालू असलेल्या गाड्या बंद केल्या आहेत. रिसोड ते अकोला ही सकाळी ५.४५ वाजता निघणारी बस बंद केली आहे तर अकोला येथून रात्री ८.३० सुटणारी गाडी बंद केली आहे. यामुळे मात्र नियमित अकोला येथे जाणारे येणाऱ्या रुग्ण व्यापारी व इतर काम करीत जाणाऱ्यांची नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. तसेच मागील ३० वर्षापासून रिसोड लोणी लोणार ही बस फेरी सुरू होती परंतु ही गाडी कधी बंद तर कधी चालू असल्यामुळे प्रवासी विद्यार्थी कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे.

सकाळची अकोला बस बंद असल्यामुळे तसेच रिसोड लोणी लोणार या मार्गावर चालणाऱ्या गाड्या नियमित असल्यामुळे याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास तर मुलींना अहिल्याबाई होळकर या योजनेतून मोफत पास दिली जाते परंतु रिसोड आगाराच्या गाड्याच नियमित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तसेच मागील पंचवीस वर्षापासून सुरू असलेली अकोला येथून रात्री ८.३० वाजता सुटणारी गाडी बंद झाल्यामुळे मालेगाव शिरपूर केशवनगर व रिसोड येथील रुग्ण व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. येथील आगार प्रमुखाच्या मनमानी कारभाराचा फटका विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक व्यापारी यांना बसत आहे.

अजूनही ९९% टक्के प्रवाशांचा महामंडळावर विश्वास आहे परंतु आगार प्रमुखाच्या मनमानीमुळे नाइलाजाने प्रवाशांना जीव मुठीत धरून अवैद्य प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. महत्त्वाच्या बस फेऱ्या बंद करून तसेच ग्रामीण भागातील काही फेऱ्या अनियमित केल्यामुळे रिसोड तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीला उधाण आले असून अवैध वाहतूकदारांची चांदी होत आहे. मागील संप काळात अवैध प्रवासी वाहने बस स्थानकात पार्किंग केल्या जात होती ती परंपरा आजही कायम आहे. नियमित असलेल्या बस फेऱ्या बंद करून एक प्रकारे अवैध प्रवासी वाहतुकीला खतपाणी घातल्या जात असल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

वाशीम आगारावर दारोमदार

वाशीम ते औरंगाबाद वाशीम ते शिर्डी वाशीम ते पुणे या वाशीम आगाराच्या गाड्या नियमित असल्यामुळे रिसोड येथील प्रवाशांना याच गड्याचा आधार घ्यावा लागत असून वाशीम आगारावरच रिसोड येथील प्रवाशांची दारोमदार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com