Washim ST depot increases bus services to manage the festive Diwali travel rush.
esakal
वाशीम, : दिवाळी सणानिमित्त गावी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाशीम आगाराने बसफेऱ्यांत वाढ केली आहे. नियमित बससेवेसोबतच गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.