Washim Yavatmal Constituency Lok Sabha Election Result: शिंदेंना पडला मतदारांच्या 'भावनां'चा विसर; यवतमाळ-वाशिममध्ये देशमुखांचा डंका

Washim Yavatmal Lok Sabha Election Result 2024 Shivsena Rajashri Patil Shivsena UBT Sanjay Deshmukh : या ठिकाणी दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमने सामने असून शिंदेसेनेच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे सेनेचे संजय देशमुख अशी लढत होत आहे.
Washim Yavatmal Constituency Lok Sabha Election Result: शिंदेंना पडला मतदारांच्या 'भावनां'चा विसर; यवतमाळ-वाशिममध्ये देशमुखांचा डंका
Updated on

Washim Yavatmal Lok Sabha Election Result 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा ९४, ४७३ मतांनी पराभव झाला असून ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख विजयी झाले आहेत.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. कारण या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेल्या भावना गवळींना यंदा शिंदेंनी घरी बसवलं आणि त्याऐवजी बाहेरच्या राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. पण या मतदारसंघात प्रत्येकवेळी अधिकची मतं घेऊन निवडून येणाऱ्या भावना गवळींना तिकीट नाकारल्याची नाराजी आणि त्याऐवजी बाहेरचा उमेदवार म्हणून राजश्री पाटलांची झालेली चर्चा यामध्ये कोण निवडून येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

वाशिम-यवतमाळ लोकसभेतील मतदारसंघांची स्थिती

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, दिग्रस व पुसद हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. तर वाशीम जिल्ह्यातील वाशीम आणि कारंजा हे दोन मतदारसंघ येतात. 2019 च्या तुलनेत यावेळी शहरी भागात चार टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद, वाशीम, कारंजा या मतदारसंघांमध्ये २०१९ च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली.

२०१९ मध्ये काय होती स्थिती?

भावना गवळी (शिवसेना) विजयी मते : ५,४२,०९८

माणिकराव ठाकरे (काँग्रेस) : ४,२४, १५९

प्रवीण पवार (वंचित) मते : ९४,२२८

वैशाली येडे (प्रहार) मते : २०,६२०

यंदाच्या निवडणुकीत गाजलेले मुद्दे

कॉटन सेझ, शेतमालावर प्रक्रिया उद्योग, महिलांची रोजगार उद्योगाचा अभाव.

सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा अभाव

वर्धा-यवतमाळ-नांदेड, शंकुतला रेल्वेचा लांबलेला प्रवास

यवतमाळमधील अमृत पाणीपुरवठा योजना

यवतमाळ शहरात फोफावलेली बालगुन्हेगारी, पोलिसांचा नसलेला वचक

विधानसभा क्षेत्रात झालेलं मतदान

दिग्रस - ६६.६१ टक्के

कारंजा - ६०.९८ टक्के

पुसद - ६१.७९ टक्के

राळेगाव - ६८.९६ टक्के

वाशिम - ६०.५६ टक्के

यवतमाळ - ५९.४६ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com