वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा      

washim zp election
washim zp election

                                                                                                                    वाशीम : येथील जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षपदाची निवड आज (ता.17) पार पडली. या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे डाॅ. शाम गाभणे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील जिल्हा परिषदेमध्ये 52 सदस्यसंख्या आहे. निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले. मात्र, निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्याप्रमाणे जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचे ठरले. त्यानुसार आज (ता.17) जिल्हापरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदासाठी डॉ. शाम गाभणे यांचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com