तहान भागवण्यासाठी यवतमाळकरांची धरपड; हंडा घेऊन भटकंती

तहान भागवण्यासाठी यवतमाळकरांची धरपड; हंडा घेऊन भटकंती

यवतमाळ : गेल्या काही वर्षापासून यवतमाळ शहर (Yavatmal City) आणि पाणी टंचाई हे समीकरणच बनले आहे. शहराला निळोणा व चापडोह या प्रकल्पातून पाणीपुरवठा (Yavatmal Water Supply) करण्यात येतो. जलवाहिनी लिकीज असल्याने गळती होणाऱ्या ठिकाणाहून हंडाभर पाणी भरून तहान भागविण्याची वेळ आली आहे. (water crisis in Yavatmal district)

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी चाळीस वर्ष जुणी असल्याने जीर्ण झाली आहे. नळाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड नेहमीच केली जाते. शहरात विकासकामाच्या नावाखाली खोदकाम करण्यात येत असल्याने जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे जलवाहिन्यांच्या व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती सुरू आहे. यात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे शहरातील अनेक प्रभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

तहान भागवण्यासाठी यवतमाळकरांची धरपड; हंडा घेऊन भटकंती
आता तुमचा स्मार्टफोन होणार अवघ्या ८ मिनिटांमध्ये फुल चार्ज

हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. महिला हातात हंडा घेवून लिकीज व्हॉल्व्हमधून पाणी भरतानाचे चित्र सर्रास बघावयास मिळते. मजिप्राच्या दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. शहरातील नारिंगेनगर, कमला पार्क, चांदोरेनगर, गिरीजानगर, पिंपळगाव, विशालनगर, राजर्षी शाहूनगर, गजानननगर, रजनी पार्क, बालाजी पार्क, सुरभीनगर, दोनाडकर ले-आउट, विश्वकर्मानगर आदी भागात पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्यजलवाहिनीचे व्हॉल्व्ह लिक झाल्याने हजारो लिटर पाण्याची गळती सुरू असल्याने नियमित पाणीपुरवठा होत नाही.

शिवाय विकासकामाच्या नावाखाली खोदकाम होत असल्याने अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटते. त्याचाही फटका शहरवासींना बसत आहे. शहरातील मुलकी, उमरसरा, अशोकनगर, आदी भागातही नियमित पाणीपुरवठा होत नाही.

मुलकी परिसरात रोजमजुरी करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही. आठवड्यातून एखाद वेळी नळ आल्यास पाणी भरण्यासाठी मोटरपंप सुरू करावे लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
-ज्ञानेश्‍वर अंगाईतकर, रहिवासी, मुलकी.

(water crisis in Yavatmal district)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com