Akola News: गतवर्षीच्या तुलनेत धरणात कमी जलसाठा! केवळ महिनाभराचा पाणीसाठा शिल्लक

Akola News
Akola News

अकोला : ‘‘अल निनो’’ समुद्र प्रवाह सक्रिय होण्‍याची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने दर्शविली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवू शकते. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात २९.६८ टक्के तर वान प्रकल्पात ३९.७६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

Akola News
Crime news : इंस्टाग्रामवरून वृद्ध महिलेला 1.80 कोटींचा गंडा; तिरुपतीला प्लॉट घेण्याचे दाखवले अमिष

मागील वर्षाच्या तुलनेने यावेळी मे महिन्यात उपलब्ध जलसाठा कमीच आहे. लघु प्रकल्प कोरडे पडले असून, अत्यल्प जलसाठा राहिला आहे. महिनाभर पाऊस लांबला तरी उपलब्ध जलसाठा पुरणारा असला तरी पाणी जरा जपूनच वापरावे लागणार आहे. अन्यथा पावसाळ्यातच भिषण पाणीटंंचाईचा सामना करावा लागू शकतो. (Latest Marathi News)

‘‘अल निनो’’ हा जागतिक हवामानावर प्रभाव टाकणारा प्रमुख घटक आहे. अल निनो समुद्र प्रवाह सक्रीय झाल्यास त्याचा प्रभाव काही महिने किंवा दोन तीन वर्षापर्यंत कायम राहतो. अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण सुद्धा कमी होवू शकते. परिणामी पाण्‍याचा जास्‍त उपसा झाल्‍याने शहरातील बोअरची पातळी सुद्धा खाली जावू शकते.

त्‍यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवण्‍याची दाट शक्‍यता नाकारता येत नाही, अशा स्थितीत येणाऱ्या वर्षात पावसाळा कमी झाल्यास शहरामध्ये पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी पिण्याचे पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे.

त्यामुळे येणाऱ्या कालावधित पाण्‍याचा वापर जपून करणे अतिआवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होण्याची शक्यता असते बांधकाम व्यवसाय, सर्व्‍हीस सेंटर इ. अशा व्‍यावसायिकांनी पेयजलचा वापर करणे बंद करावे. नागरिकांनी पिण्‍याच्‍या पाण्‍याचा काटकसरीने वापर करून पाण्‍याचा अपव्‍यय टाळावा. (Marathi Tajya Batmya)

Akola News
Deccan Queen : पालिका अन् रेल्वे प्रशासनात भरडला जातोय पुणेकर

जिल्ह्यातील प्रलकल्पांची स्थिती चिंताजनक

जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि २३ लघु प्रकल्प अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात. मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने जवळपास सर्वच लघु प्रकल्प ओसंडू वाहिले.

मोठ्या आणि मध्यम प्रकल्पाचे अनेकवेळा दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे मोठ्या आणि मध्यम प्रकल्पात समाधानकारक जलसाठा झाला होता.

मात्र, आता पावसाला सुरुवात होण्यास विलंब होण्याची स्थिती आहे. त्यातच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीसुमारे चार ते पाच टक्के कमी जलसाठा असल्याने भविष्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

मागील वर्षाच्या तुलनेने जलसाठा कमी

मागील वर्षी ३१ मे रोजी काटेपूर्णा प्रकल्पात ३३.७२ टक्के तर वान प्रकल्पात ४५.१६ टक्के जलसाठा उपलब्ध होता. या तुलनेने या वर्षी या दोन्ही प्रकल्पात जलसाठा कमी आहे.

काटेपूर्णा प्रकल्पात जिवंत जलसाठा ३६.९२ दलघमी असून, ३१ मे रोजी त्याची टक्केवारी २९.६४ एवढी आहे. वान प्रकल्पात ३४.१० दलघमी जिवंत साठा असून, त्याची टक्केवारी ३९.७६ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com