कलपाथरीवासींची तृष्णा कशी भागणार? पाणीटाकी केवळ शोभेचीच

Water scarity in this villege, water tank is only for show
Water scarity in this villege, water tank is only for show
Updated on

गोरेगाव : तालुक्‍यातील अनेक गावांत उन्हाळ्यातही पाणीटंचाई नाही, असे तालुका प्रशासन सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात या गावात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले नसल्याने कलपाथरीतील गावकऱ्यांना हातपंप, विहीर, नळयोजना असूनही पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी कलपाथरीवासींनी केली आहे.

कलपाथरी हे दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात 13 हातपंप व 4 विहिरीसुद्धा आहेत. या हातपंप आणि विहिरींवरच गावाची तहान भागवली जाते. परंतु दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालवल्याने दरवर्षी गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2017 मध्ये नळयोजनेचे ऑनलाइन भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यानंतर 2018 मध्ये या नळयोजनेच्या कामाला सुरुवातही झाली. आता या नळयोजनेचे कामही पूर्ण झाले आहे. परंतु नळयोजनेला वीजजोडणीचा व्यत्यय आल्याने तयार करण्यात आलेली पाणीटाकी शोभेची वस्तू ठरली आहे. सध्या गावकऱ्यांवर पाण्यासाठी वण-वण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या पाणीटंचाईला जबाबदार कोण, गावकऱ्यांची तहान भागविणार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत. अखेर ही नळयोजना सुरू करण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला. मात्र त्यांच्या प्रयत्नाला प्रशासनातील अधिकारी आडवे आले. त्यामुळे वीजजोडणीही करता आली नाही. वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी हात वर करीत सांगितले की, जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर वीजजोडणी करता येईल. पण निधीअभावी ही वीजजोडणी रखडली आहे. आता दोनच हातपंपावर दीड हजार नागरिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सामाजिक अंतर ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

पाणीटंचाई नाहीच
कलपाथरी येथे पाणीटंचाई नाही. गावातील सर्व हातपंप सुरू आहेत. नळ योजनेचे कामही पूर्ण झाले आहे.
झामसिंग टेंभरे, गटविकास अधिकारी, गोरेगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com