तुम्ही रोगयुक्त फळे तर खात नाही ना ?

mango.jpg
mango.jpg

नागपूर, : कारोना रोग आपल्याला होऊ नये, यासाठी आजकाल फळे खाण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत असे सारेच फळांचा वापर करीत आहेत. मात्र, नागरिकांनो सावधान. तुम्ही जी फळे चाखत आहात ती नैसर्गिकरित्या पिकविली आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. कारण केवळ नफा कमावण्यासाठी कार्बाईड गॅसचा वापर करून फळे पिकविली जात आहेत. अशी अनैसर्गिकरित्या पिकलेली फळांचा वापर केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढणे तर सोडाच उलट चांगले शरीर रोगांचे खर होण्याची शक्यता अधिक आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. विशेषतः "व्हिटॅमिन सी'युक्त फळांच्या सेवनावर भर देण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. सध्या बाजारात व्हिटॅमिन सी'युक्त फळात लिंबू, संत्रा, आवळा आदी उपलब्ध आहे. परंतु, आंब्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असून सध्या हंगाम असल्याने प्रत्येकाला हे फळ आकर्षित करीत आहे. आंब्याचे बैगन फल्ली, लंगडा, केसरी, दशहरी असे अनेक प्रकार सध्या बाजारात विक्रीस आहेत. हे आंबे नैसर्गिकरीत्या न पिकविता कार्बाईड गॅसचा वापर करून पिकवली जात असून, अन्न व औषधी प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे यांनी केला.

आंबेच नव्हे, तर पपई, केळी आदी फळेही अनेक वर्षांपासून कार्बाईडने पिकवली जात आहेत. एवढेच नव्हे, उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असलेल्या टरबूजमध्येही आरोग्याला अपायकारक रंग वापरून ते लाल केले जाते. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे. याबाबत महापालिका, जिल्हाधिकारी, अन्न व औषधी प्रशासनाकडे अनेक निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांचा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकडे कल आहे. "व्हिटॅमिन सी'युक्त फळांमध्ये आंबा आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. मात्र, शहरात अशी कार्बाईडने पिकवलेली फळे असेल, तर रोगप्रतिकारशक्ती वाढण्याऐवजी आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्‍यताही पांडे यांनी व्यक्त केली. कार्बाईडने पिकवलेली फळे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.


कारवाई आवश्यक- गजानन पांडे
आंबा, पपई, केळी आदी फळे अनेक वर्षांपासून कार्बाईड गॅसने कृत्रिमरीत्या पिकविली जातात. याची अन्न व औषध प्रशासनालाही जाणीव आहे. अनेकदा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अ. भा. ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताचे संघटनमंत्री
गजानन पांडे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com