निम्मे शहर उद्या पाण्याशिवाय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

नागपूर - बोरियापुरातील दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शनिवारी जलवाहिनी जोडणीची कामे केली जाणार आहे. याशिवाय वांजरा येथील जलकुंभाच्या जलवाहिनीवरही नासुप्रद्वारे कामे केली जाणार आहे. त्यामुळे गांधीबागसह सह पाच झोनमध्ये ३० जून रोजी दिवसभर तर १ जुलै रोजी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

नागपूर - बोरियापुरातील दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शनिवारी जलवाहिनी जोडणीची कामे केली जाणार आहे. याशिवाय वांजरा येथील जलकुंभाच्या जलवाहिनीवरही नासुप्रद्वारे कामे केली जाणार आहे. त्यामुळे गांधीबागसह सह पाच झोनमध्ये ३० जून रोजी दिवसभर तर १ जुलै रोजी सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 

पालिका, ओसीडब्ल्यूने नुकताच मोमिनपुरा भागात पेहलवान चौक ते गोळीबार चौकादरम्यान नवीन जलवाहिनी टाकली आहे. ही जलवाहिनी जुन्या जलवाहिनीशी जोडण्याचे काम ३० जून सकाळी १० ते १ जुलै सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहील. त्यामुळे महापालिका-ओसीडब्ल्यूने २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले. त्यामुळे गांधीबाग, सतरंजीपुरा, आशीनगर, हनुमाननगर, धंतोली झोनसह वांजरा जलकुंभांतर्गत येणाऱ्या वस्त्यांत पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय  नागपूर सुधार प्रन्यासनेही नारा येथे प्रस्तावित जलकुंभासाठी जलवाहिनीची आंतरजोडणी तसेच महावितरणद्वारे गोधनीतील पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्रात देखरेखीचे काम केले जाणार आहे. कळमना जलकुंभ ते वांजरा जलकुंभापर्यंतही कळमना रेल्वे क्रॉसिंगजवळ आंतरजोडणी करण्याचेही काम होणार आहे. त्यामुळे लष्करीबाग, मोतीबाग रेल्वे क्वार्टर, मेयो हॉस्पिटल, हंसापुरी, भागवाघर चौक, मोमिनपुरा, काला झेंडा तकिया, भानखेडा, दादरापूल टिमकी, गोळीबार चौक, देवघरपूर, गंगाखेत चौक, बाजीराव गल्ली, पाचपावली रेल्वे गेट, पिली मारबत, धापोडकर गल्ली (तांडापेठ), लाल दरवाजा, बंगाली पंजा, मस्कासाथ, इतवारी तेलीपुरा, मिरची बाजार चौक, भाजी मंडी, लोहाओळी, तीन नळ चौक, खापरीपुरा, भाजी मंडी, टांगा स्टॅंड, रामनगर,  बांगलादेश, उमाठेवाडी, बैरागीपुरा, तेलीपुरा पेवठा, बारईपुरा, मिरची मंदिर भाग, इतवारी रेल्वेस्टेशन, मारवाडी चौक, पंजाबी लाइन कामठी रोड गुरुद्वाराजवळ, लाल इमली, खापरीपुरा या भागात पाणीपुरवठा होणार नाही. याशिवाय बोरियापुरा जलकुंभांतर्गत येणाऱ्या मोमिनपुरा, हरिदारी रोड, कसाबपुरा, तकिया दिवानशाह, तकिया मेहबूब शाह, हंसापुरी, नंदबाजी डोब, कोसारकर मोहल्ला येथेही पाणीपुरवठा बंद राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water shortage in nagpur city