कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही पण सज्ज, बचतगटाच्या महिलांनी केले हे विशेष काम...

We are ready to fight the Coronas, this special work by the women of the savings group ...
We are ready to fight the Coronas, this special work by the women of the savings group ...
Updated on

राजूरा (जि. चंद्रपूर) : देशभरात कोरोनामुळे दहशत पसरलेली असून देशात एकवीस दिवस लाँकडाऊन आहे. प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी  आहे. आंतर जिल्हा व आंतर राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन धडपडत  आहे. मास्कचा तुटवडा जाणवत आहे. अशा स्थितीत नागरिक, प्रशासनातील कर्मचारी, सफाई कामगारांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदे अंतर्गत महिला बचत गटातील महिलांना घरबसल्या युट्युबवरून मास्क बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. लॉकडाऊनच्या स्थितीतही शहरातील झोपडपट्टी भागातील सोनियानगर येथील बचत गटातील महिला मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद राजुरा अंतर्गत श्रद्धा वस्ती स्तर संस्था सोनिया नगर राजुरा येथील बचत गटातील महिला मास्क बनविण्यासाठी अतिशय विपरीत परिस्थितीत काम करीत आहेत.
लॉकडाऊन नंतर राजुरा नगरपरिषदेने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली. शहरातील शासकीय कार्यालये, बँक ऑफिस, बस स्टॉप , भाजीपाला मार्केट शेड तसेच शहरातील प्रत्येक वार्डात निर्जंतुकीकरण मोहीम राबविली. सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने दैनिक भाजीपाला मार्केट; आठवडी बाजार बंद करण्यात आला.

बाहेरून आलेल्या विद्यार्थी व नागरिकांना होम कोरेनटाईन करण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करुन देण्यात आली. सुरक्षेच्यादृष्टीने सर्व सफाई कामगारांना व इतर  कार्यालयातील कर्मचारी यांना मास्क देण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांना काम देण्यात आले. सोनिया नगर येथील बचत गटातील महिला मागील पाच दिवसांपासून मास्क बनविण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. कुठल्याही प्रशिक्षणा शिवाय नगराध्यक्ष अरुण धोटे यांचे प्रोत्साहन व मुख्याधिकारी जुही अर्शिया यांच्या मार्गदर्शनाखाली युट्युबवरून मास्क बनविण्याचे कौशल्य प्राप्त केले.

सुरेखा पटेल यांच्या माध्यमातून महिला बचत गट समूहाने नुकतेच पाचशे मास्क बनवून नगरपरिषदेकडे सुपूर्द केलेत. अतिशय कठीण परिस्थितीतही सोनिया नगर येथील महिला पुढाकार घेऊन मास्क तयार करण्याच्या कामात गुंतलेल्या आहेत. आणखी पाचशे मास्क नगरपरिषदेला देणे आहे.

शहरातील सोनिया नगर येथील झोपडपट्टीतील महिला बचत गटातील सदस्यांनी घेतलेला पुढाकार हा निश्चितच कौतुकास्पद आहे. 500 मास्क तयार करून नगर परिषदेने पुरवठा केलेला आहे. पुन्हा पाचशे मास्क बनवण्याचे काम बचत गटाला मिळालेले आहे. त्यामुळे बचत गटातील महिला हिरीरीने काम करीत आहेत. यात समन्वक सुरेखा पटेल यांचे मोलाचे सहकार्य बचत गटातील महिलांना मिळत आहे. शहरातील सफाई कामगार इतर कर्मचारी व नागरिकांनाही मास्क उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा मानस आहे.

पुढाकार कौतुकास्पद
लाकडाऊन स्थितीमध्ये नगरपरिषदेतील सफाई कामगार व इतर कर्मचाऱ्यांना मास्क पुरवण्यासाठी सोनिया नगर येथील बचत गटाला काम देण्यात आले. मात्र  संचारबंदीमुळे मार्गदर्शन कसे करावे हे समजत नव्हते. त्यामुळे युट्युब वरून त्यांना मास्क बनविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. गटातील महिलांनी अतिशय चांगल्या दर्जाचे कॉटनचे मास्क तयार केलेले आहेत. गरजेनुसार नागरिकांसाठीही उपलब्ध करून देता येईल.
- जूही अर्शिया
मुख्याधिकारी नगरपरिषद ,राजुरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com