Vidarbha Cold Wave: "विदर्भ थंडीत थरथरला! नागपूरमध्ये 10.5°C, पुढील दोन दिवसही थंडीचा इशारा"
Nagpur Temperature: विदर्भात थंडीची लाट; नागपूरमध्ये किमान तापमान १०.५°C, यवतमाळ सर्वात थंड. नागरिकांनी उबदार कपडे वापरण्याचे आवाहन. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया येथे तापमानात घट, पुढील दोन दिवस थंडीचा इशारा.
नागपूर : विदर्भातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट आलेली आहे. सोमवारी (ता.१७) नागपूरमध्ये पहाटे किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. रविवारच्या तुलनेत ०.३ अंशाने तापमान घसरले आहे.