

Invitations Distributed, Venue Ready—But Groom Never Arrived Over Dowry Dispute
sakal
वर्धा: हुंडा मागणे आणि देणे कायद्याने गुन्हा असताना ही प्रथा आजही कायम असल्याचे हिंगणघाट येथे पुढे आले आहे. या हुंड्यासाठी रुसलेला नवरदेव मंडपात आला नसल्याने वधू पित्याने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून केलेल्या चौकशीअंती या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांकडून नवरदेव आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला.