दहावी-बारावीच्या पुनर्परीक्षांचा काय आहे संभ्रम... वाचा 

प्रभाकर कोळसे 
Wednesday, 9 September 2020

दरवर्षी दहावी बारावीचे निकाल जाहीर होताच पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. यंदा मात्र कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसून अद्याप हे वेळापत्रक अंधारातच असल्याने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची शक्‍यता आहे.

नंदोरी ( वर्धा) : राज्य शिक्षण मंडळाचे दहावी बारावीचे निकाल जाहीर होऊन महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असताना पुनर्परीक्षा संदर्भात राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप कुठलीही घोषणा करण्यात न आल्याने राज्यातील बारावी अनुत्तीर्ण १ लाख ८४ हजार ६१३ नागपूर विभागातील १८ हजार २४८ तर दहावीचे राज्यातील १ लाख १७ हजार २७१, नागपूर विभागातील १३ लाख ४९२ विद्यार्थ्याचा जीव टांगणीला लागला आहे.

हे काय... मेयोतून पळाले कोरोना बाधित, सजग सुरक्षादलामुळे टळला हा प्रसंग   

दरवर्षी दहावी बारावीचे निकाल जाहीर होताच पुनर्परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. यंदा मात्र कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसून अद्याप हे वेळापत्रक अंधारातच असल्याने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची शक्‍यता आहे. कारण राज्यातील शाळा महाविद्यालये अद्याप बंद असली तरी अकरावी,पदवी प्रथम वर्ष, आयटीआय, तंत्र निकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू  झाली आहे  मात्र, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षांसंदर्भात अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याने त्यांची परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार आणि पुढील वर्गात प्रवेश केव्हा होणार ? कारण पहिले शैक्षणिक सत्र संपायला फारसा अवधीही शिल्लक नाही. परिणामी अशा फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे  
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी, बारावीच्या निकालास बराच विलंब झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्परीक्षाचे वेळापत्रकाची घोषणा राज्य शिक्षण मंडळाकडून होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासन कुठलीही परीक्षा घेण्याच्या मनःस्थितीत नाही. एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. दहावी, बारावीच्याही पुनर्परीक्षा होणार किंवा नाही याविषयी विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे

 कोरोनाचा फटका
यावर्षी कोरोना संसर्गामुळे दहावी बारावीचे निकाल च उशिरा जाहीर करण्यात आले. त्यामुळे नागपूर विभागातील दहावीच्या १३ लाख ४९२ तर बारावीच्या १९ लाख २४८ विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षाची घोषणा केव्हा होणार याची प्रतीक्षा लागली आहे.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the confusion of 10th-12th re-examinations ... read on