असे काय झाले की, अंगणवाडीसेविका पडल्या बुचकळ्यात!.. वाचा 

रूपेश खैरी 
Monday, 6 July 2020

ज्या मुलांचे वजन उंची करायचे आहे त्या सर्वांसाठी मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याबाबत मात्र कुठल्या सूचना नाहीत. अशातच कोविड 19 काळात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या आदेशाने सीडीपीओ पर्यवेक्षिका यांची सेवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहे.

वर्धा : सध्या असलेल्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार अंगणवाडीसेविकांचे कोरोना संसर्ग रोखण्याकरिता अत्यावश्‍यक सेवा देत आहेत. यातच एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाडी सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले. यातही दररोज गोरथ मॉनिटरींगनुसार काम करा असे म्हटले आहे. आता आपत्ती व्यवस्थापनाने दिलेले काम करावे की एकात्मिक बालाविकास योजनेच्या आदेशाचे पालन करावे अशा विचारात अंगणवाडीसेविका पडल्या आहेत. हे वाचा—काय ही श्रीमंती? नायब तहसीलदार साहेबांनी कापले हॅपी बर्थडेला नऊ केक... 

हे वाचा—काय ही श्रीमंती? नायब तहसीलदार साहेबांनी कापले हॅपी बर्थडेला नऊ केक... 
 

अंगणवाडी केंद्र तीन महिन्यांपासून बंद 
राज्यातील अंगणवाडी केंद्र गत तीन महिन्यापासून बंद आहेत. सध्याच्या स्थितीत त्यांचा वापर करण्यापूर्वी त्यांचे निर्जुंतीकरण करणे अनिवार्य आहे. दररोज वजन उंची करण्यासाठी येणारी मुले, त्यांचे पालक आणि गर्भवती महिला यांच्यात सोशल डिस्टंन्स पाळणे शक्‍य नाही. ज्या मुलांचे वजन उंची करायचे आहे त्या सर्वांसाठी मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करण्याबाबत मात्र कुठल्या सूचना नाहीत. अशातच कोविड 19 काळात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या आदेशाने सीडीपीओ पर्यवेक्षिका यांची सेवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामळे अहवाल पाठविण्याच्या अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

हे वाचा— कोरोना मास्कवरती पैठणीचा मोर नाचरा हवा...आता मास्कच्याही नाना तऱ्हा 
 

दररोज पाचच मुलांचे करा वजन 
या आदेशानुसार दररोज पाच मुलांचे वजन करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना देण्यात येणार असलेला पोषण आहार सध्या घरपोच देण्यात येत आहे. त्यामुळे या कामाकरिता जास्त वेळ अंगणवाडी सुरू ठेवण्याची गरज नाही. तर, ुले येत नसतील तर नोंदीनुसार त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर त्यांच्या भागात असलेली इतर कामे त्यांनी करावे असे आदेशात म्हटले आहे. 

अंगणवाडी सेविका सध्या आपत्तीव्यवस्थापन कायद्यानुसार कार्य करीत आहेत. त्यांना हे कार्य थांबविण्यासंदर्भात कुठलेही आदेश नाही. पण, एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत अंगणवाडी सुरू करण्याचे आदेश आले आहेत. यामुळे चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्याची मागणी सर्वांकडून करण्यात आली आहे. 
- दिलीप उटाणे,राज्य उपाध्यक्ष, आयटक 

अंगणवाडी सेविकांना तीन महिन्यांसाठी कोरोना आणि सारी सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. ते काम आता पूर्ण झाले आहे. यामुळे अंगणवाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, त्यांना केवळ पाचच मुलांचे वजन करावयाचे आहे. इतर वेळेत त्यांना असलेली कामे त्यांनी करावी. 
- विपुल जाधव,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जि..प. वर्धा  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened is that the Anganwadi workers were confused! .. Read