online fraud.jpg
online fraud.jpg

Lockdown : ऑनलाइन खरेदी करताय, तर सावधान; होऊ शकते तुमचीही फसवणूक...वाचा

Published on

अकोला : लॉकडाउन असल्यामुळे घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग किंवा फूड्‌स डिलिव्हरी करण्यावर नागरिकांचा भर आहे. त्यामुळे अनेकांनी मोबाईलमध्ये पेमेंट ॲप्स डाऊनलोड केले आहेत. सायबर गुन्हेगारांनी यांचाच लाभ उठवित ऑनलाइन गंडा घालणे सुरू केले आहे. गेल्या काही महिन्यांत ऑनलाइन फसवणुकींच्या गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेमेंट ॲप्स वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. इंटरनेटवरून घरबसल्या वस्तू बोलावणे, ड्रेस, घरगुती सामान आणि फूड मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासोबतच कुणाला पैसे पाठवणे किंवा बिल चुकते करणे, मोबाईल बिल, वीज बिल, मोबाईल रिचार्ज यासह किराणा दुकानातील सामान विकत घेण्यापर्यंत आता मोबाईलवरून पेमेंट केल्या जात आहे. स्मार्टफोनमध्ये पेटीएम, गुगल पे आणि फोन पे यासह अन्य ॲप्स डाऊनलोड केल्यानंतर डिजिटल व्यवहार सोपे झाले आहे. मात्र, याच संधीचा लाभ सायबर गुन्हेगारांनी उचलला आहे. 

गेल्या काही महिन्यात ऑनलाइन फसवणुकीत वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातून लाखो रूपये परस्पर काढून घेत आहेत. बॅंकेतून बोलतो, पेटीएमची केवायसी करून देतो, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे असे अनेक फंडे सायबर गुन्हेगार वापरून नागरिकांना जाळ्यात ओढतात.

महागडे स्मार्ट फोन वापरराणाऱ्यांना सायबर गुन्हेगार गंडवित आहेत. फसगत होणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांची संख्या मोठी आहे. पोलिसांनी फेक मॅसेज किंवा बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्यांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन वारंवार केल्यानंतरही उच्चशिक्षित पुरुष व महिलांची ऑनलाइन फसवणूक होत आहे.

ओएलक्‍सवरूनही गंडा
ओएलएक्‍स वेबसाइटवर सेकंड हॅण्ड चारचाकी गाड्या, बुलेट्‌स, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि अन्य गॅझेट्‌स कमी किंमतीत विक्रीला उपलब्ध असल्याची जाहिरात आधी टाकली जाते. ‘गूगल पे चा क्‍यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवा’, असे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित ग्राहकाच्या व्हॉट्‌सॲप नंबरवर डिलिव्हरीचे अपडेट पाठवले जातात. प्रत्येकवेळी पैशांची मागणी केली जाते. मात्र, मागवलेली वस्तू काही ग्राहकांना मिळत नाही.

महिला छळवणुकीचे दोन गुन्हे दाखल
ऑनलाइन फसवणुकी बरोबरच महिला छळवणुकीची दोन प्रकरणे सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. तर अनेक गुन्हे ऑनलाइन फसवणुकीचे दाखल असून, सायबर विभाग या प्रकरणाचा तपास करीत आहे.

‘घरबसल्या कमवा एवढे पैसे’ आशा फोन न होते फसवणूक
लॉटरी जिंकली, बॅंकेतून बोलतोय, पेटीएम केवायसी आणि एटीएम ब्लॉक झाले, यासंदर्भात कुणी फोन केल्यास त्याच्यावर विश्‍वास ठेवू नये. तो सायबर गुन्हेगार असू शकतो. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर सेलमध्ये तक्रार करावी. असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com