esakal | शिकारीटोला, घटेगावच्या नागरिकांना कधी मिळणार पक्का रस्ता?...पावसाळ्यात पायवाटेनेच प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

पांढरी : शिकारीटोला-घटेगावला जोडणारी पायवाट.

शिकारीटोला ते घटेगाव या गावांचे पायवाटेने कच्च्या रस्त्याचे अंतर दीड किलोमीटर आहे. परंतु, सरळ मार्ग व पूल नसल्याने या दोन्ही गावांतील नागरिकांना पावसाळ्यात मुंडीपार ई.च्या दिशेने सात ते आठ किलोमीटर अंतर पडते. पावसाळा वगळता वर्षभर नागरिकांना याच कच्च्या रस्त्याने मार्गक्रमण करावे लागते.

शिकारीटोला, घटेगावच्या नागरिकांना कधी मिळणार पक्का रस्ता?...पावसाळ्यात पायवाटेनेच प्रवास

sakal_logo
By
जितेंद्र चन्ने

पांढरी (जि. गोंदिया) : सडक अर्जुनी तालुक्‍यातील पांढरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिकारीटोला व घटेगाव या दोन्ही गावांना सरळ मार्गाने जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. परिणामी, गावकऱ्यांना आजही कच्च्या पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. उल्लेखनीय म्हणजे, पावसाळ्यात या दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो.

शिकारीटोला ते घटेगाव या गावांचे पायवाटेने कच्च्या रस्त्याचे अंतर दीड किलोमीटर आहे. परंतु, सरळ मार्ग व पूल नसल्याने या दोन्ही गावांतील नागरिकांना पावसाळ्यात मुंडीपार ई.च्या दिशेने सात ते आठ किलोमीटर अंतर पडते. पांढरीकडून जायचे असल्यास पाच ते सहा किलोमीटर अंतर गाठावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही भागांत झुडपी जंगल आहे. त्यामुळे नेहमी वन्यप्राण्यांची भीती असते. पावसाळा वगळता वर्षभर नागरिकांना याच कच्च्या रस्त्याने मार्गक्रमण करावे लागते.

मोठा नाला अडसर

दोन्ही गावांच्या मधात एक मोठा नाला वाहत असतो. उन्हाळा व हिवाळ्यात या मार्गाने गावकरी, शेतकरी मोठ्या प्रमाणात आवागमन करतात. पण पावसाळ्यात फजिती होते. पायवाटेने जाताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पायवाटेच्या काही भागांत झुडपी जंगलाचे साम्राज्य पसरले आहे. पावसाच्या दिवसात हा मार्ग पूर्णतः बंदच असतो. पूल नसल्याने नाल्याला बहुधा पूर असतो. दरम्यान, जोपर्यंत पुराची पातळी कमी होत नाही, तोपर्यंत येणे-जाणे करता येऊ शकत नाही. संबंधित विभागाने पक्का रस्ता व पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी दोन्ही गावांतील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : प्रशासन पडले चिंतेत; भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक


दुर्दैव या परिसराचे...

परिसरात बहुतेक ठिकाणी पूल आहेत. मात्र, त्यापैकी बऱ्याच पुलांची उंची फार कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहतूक बाधित होऊन रस्ता बंद होत असतो. हे या परिसराचे दुर्दैवच म्हणावे लागेल. तरीही नागरिक या परिस्थितीचा समाना करीत आहेत.

जाणून घ्या : पावसाळा सुरू झालाय... तुम्हाला माहिती आहे का? कोणता पाऊस मानला जातो हानीकारक

दोन्ही गावांनी दिले प्रतिनिधित्व

दहा वर्षांत पांढरी जिल्हा परिषद क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान शिकारीटोला व घटेगाव या दोन्ही गावांना मिळाला आहे. मात्र, याच मार्गावर रस्ता व पूल न बनणे हे स्थानिकांना न समजणारे कोडेच आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)