का मिळत नाही शिक्षकांना १ तारखेला पगार ?काय असावी कारणे, वाचा सविस्तर

मंगेश गोमासे
Thursday, 13 August 2020

शिक्षकांचा पगार एक तारखेला करण्याचे राज्य सरकारने मान्य केले. त्यानुसार दर महिन्याच्या एक तारखेला शिक्षकांचा पगार व्हायचा. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वेतन अधिक्षकाकडून विलंबाने शाळांना वेतन बिले मागविले जातात. या मागचे रहस्य काय हे कळायला मार्ग नाही?. एक तारखेला पगार झालाच पाहिजे असा शासनादेश आहे.

नागपूर ः महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांचे पगार न चुकता दरमहा एक तारखेला होत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांना केवळ वेतन पथक कार्यालय आणि नागपूर जिल्हा कोषागार यांच्या दिरंगाईमुळे पगार वेळेवर मिळण्याच्या हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे. मागील चार-पाच महिन्यापासून सातत्याने १०ते १५ तारखेच्या जवळपास शिक्षकांना पगार मिळतो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या १ तारखेच्या पगाराला ‘खो` मिळत असल्याचे चित्र आहे.

शिक्षकांचा पगार एक तारखेला करण्याचे राज्य सरकारने मान्य केले. त्यानुसार दर महिन्याच्या एक तारखेला शिक्षकांचा पगार व्हायचा. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वेतन अधिक्षकाकडून विलंबाने शाळांना वेतन बिले मागविले जातात. या मागचे रहस्य काय हे कळायला मार्ग नाही?. एक तारखेला पगार झालाच पाहिजे असा शासनादेश आहे.

का वाढली कनिष्ठ महाविद्यालयांची चिंता ?...वाचा सविस्तर

या आदेशाकडे नागपूर जिल्ह्यातील वेतन अधिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी दुर्लक्ष करतांना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यातील शिक्षक समन्वय समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी व वेतन अधिक्षक यांच्याशी संवाद साधण्यात आला. यानंतरही जिल्ह्यातील सत्तावीस हजार प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे वेतन रखडले आहे.

कर्जांचे हप्ते चुकतात
पगार वेळेवर झाले नाही की कर्जाचा हप्ता चुकतो, देणी चुकतात. चेक बाऊन्स होतो. यामुळे हजार रुपयापर्यंतची प्रत्येक महिन्यात पेनाल्टी बसते .हा भुर्दंड शिक्षकांनी का सोसावा? असा सवाल आता शिक्षक संघटना विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे येणारे महिने सनासुदीचे असताना अजूनही वेतन शिक्षकांच्या खात्यात जमा झाले नाही. कधी पर्यंत होईल याचे उत्तर प्रशासनाकडे सापडत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why teachers don't get salary on 1st date