अरे देवा चक्क पत्नीलाच केले ब्लॅकमेल!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : आपल्याशी अनैसर्गिक कृत्य करून गुप्त कॅमेऱ्याने अश्‍लील छायाचित्रे काढली आणि शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार एका पीडित महिलेने फ्रेजरपुरा पोलिसात नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणात पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.


शहरातील एका तरुणीचा वर्धा जिल्ह्यात विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळीकडून विविध कारणांसाठी त्रास देणे सुरू झाले. सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येऊ लागला. कुटुंबातील सदस्यांकडून तिला ब्लॅकमेल केल्या जाऊ लागले. अखेर पीडितेने माहेरी आल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, तिचे जानेवारी 2019 मध्ये लग्न झाले. लग्नाच्या दहा दिवसांनंतरच पतीसह सासरच्यांनी नोकरी करण्याचा तगादा लावून वडिलांकडून मोपेड वाहन आणण्यास सांगितले. लग्नात सप्रेमभेट वस्तू कमी आल्याच्या कारणावरून सासरच्यांनी अनेकदा घराबाहेर काढून दिले.

पतीनेही शारीरिक संबंध ठेवताना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला. छोट्या कॅमेऱ्याद्वारे आणि मोबाईलवरून बाथरूम तसेच बेडरूममध्ये अश्‍लील छायाचित्रे काढली. इच्छेविरुद्ध जबरीने अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. पतीच्या या कृत्यास सासरच्यांनी प्रोत्साहन दिले. पतीने अश्‍लील फोटो गुगलवर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. नागपूरला एकटे राहावे लागेल, असे सांगून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिनेसुद्धा काढून घेतले. सासरच्या छळाला कंटाळून अखेर तिने अमरावतीत माहेर गाठले. सासरच्या या कृत्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीला नांदविण्याबाबत बैठका झाल्या. परंतु तेथे सासरच्यांनी आई-वडिलांशीच उद्धटपणे वर्तन करून धमक्‍या दिल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com