किती हे दुर्दैव! अवघ्या २५व्या वर्षी जावे लागले तिरडीवर, कुंकूच ठरले वैरी

wife murder by her husband in amravati crime news
wife murder by her husband in amravati crime news

अमरावती : कौटुंबिक कारणावरून पत्नीसोबत सुरू असलेल्या वादामुळे पतीने माहेरी येऊन तिचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना टेंभुरखेडा या गावात घडली. गुरुवारी (ता 4) रात्री याप्रकरणी वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

अंकिता दीपक जिचकार (वय 25) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती वरुडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संघरक्षक भगत यांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी मृत अंकिताचा पती दीपक राजेंद्र जिचकार (वय 29, रा. सावंगी, ह.मु.टेंभुरखेडा) विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला शुक्रवारी (ता. 5) वरुड पोलिसांनी अटक केली. मागील काही दिवसांपासून जिचकार दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणावरून वादविवाद सुरू होता. त्यामुळे पत्नी अंकिता ही माहेरी राहत होती. 12 जानेवारी 2021 रोजी दीपकच्या मेहूणीचा साखरपुडा होता. त्या समारंभाला सुद्धा दीपक याने विरोध केला होता. त्यामुळे त्याच्या सासरच्यांनी त्याला पुन्हा हाकलून दिले होते. त्यावेळी त्याने वाद घालताना काहींना जीवाने मारण्याची धमकी सुद्धा दिली होती, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेच्या दिवशी दीपक पुन्हा गावात पत्नीच्या माहेरी आला. घरात अंकिता आपल्या खोलीत एकटीच असल्याचे बघून दीपकने तिचा आधी दोरीने गळा आवळला. त्याचे समाधान न झाल्यामुळे पुन्हा केबलने गळा आवळून पत्नी अंकिता हिचा खून केला. बाहेर कुणाला दिसू नये यासाठी आतून खोलीचे समोरील दार बंद केले होते. खून करून दीपकने पळ काढला. अंकिता हिच्या भावाने तिच्या खोलीजवळ जाऊन आवाज दिला असता, तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याने मागच्या दारातून बघितले असता मोठी बहीण अंकिता ही घरात मृतावस्थेत त्याला पडून दिसली. मृत अंकिता हिची बहीण अमृता अळसपुरे हिने वरुड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून जावई दीपक जिचकारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली. 

कौटुंबिक वाद हेच पत्नीचा खून करण्यामागील कारण असल्याचे प्राथमिक माहितीवरुन दिसून येते. पोलिसांनी याप्रकरणात काहींचे बयाण नोंदविले.
-संघरक्षक भगत, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वरुड ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com