esakal | मटण शिजविण्यास नकार दिल्याने त्याचे डोके भडकले अन्‌.... 
sakal

बोलून बातमी शोधा

beating

प्रमोद महादेव थेटे (वय 32, रा. वायगाव) याने सहा मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पत्नीकडे मटणाची भाजी व पोळ्या करण्याचा हट्ट धरला. एकादशीचा उपवास असल्याने पत्नीने घरात मांस शिजविण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला.

मटण शिजविण्यास नकार दिल्याने त्याचे डोके भडकले अन्‌.... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एकादशी असल्यामुळे पत्नीने मटणाची भाजी करण्यास नकार दिल्याने पतीचे डोके भडकले. एवढ्याशा कारणावरून त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नीने ही बाब तिच्या माहेरच्यांना कळविली. त्यानंतर मेहुण्यासह माहेरच्या इतर नातेवाइकांनी जावयावर प्रतिहल्ला चढविल्याची घटना वलगाव ठाण्याच्या हद्दीत वायगाव परिसरात शुक्रवारी, 6 मार्च रोजी सायंकाळी घडली. वलगाव पोलिसांनी यासंदर्भात शनिवारी (ता. सात) परस्परविरुद्ध तक्रारीवरून रात्री गुन्हे दाखल केले. 

अवश्य वाचा- आश्चर्यम! घोडीने दिला गाढवाला जन्म

प्रमोद महादेव थेटे (वय 32, रा. वायगाव) याने सहा मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पत्नीकडे मटणाची भाजी व पोळ्या करण्याचा हट्ट धरला. एकादशीचा उपवास असल्याने पत्नीने घरात मांस शिजविण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रमोदने पत्नीला बेदम मारहाण करून जखमी केले. शिवाय तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली, असा आरोप जखमी पत्नीने वलगाव ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे. पोलिसांनी पती प्रमोदविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
याच प्रकरणात परस्परविरुद्ध बाजूने पती प्रमोद थेटे याने वलगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात त्याने म्हटले आहे की, मटणाच्या भाजीवरून पत्नीसोबत प्रथम वाद व नंतर झटापट झाली. पत्नीने तत्काळ आपल्या भावांसह इतर नातेवाइकांना वायगावात बोलावून घेतले. 

बहिणीचा फोन येताच माहेरचे आले धावून

बहिणीचा फोन येताच सचिन हरिदास नाठे, चेतन हरिदास नाठे, हरिदास झिंगाजी नाठे, रोशन संगीत नाठे, शिवा संगीत नाठे, पप्पू मानकर (सर्व रा. अडणगाव) यांनी बहिणीला मारहाण केल्याच्या कारणावरून जावई प्रमोद थेटे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली, असा आरोप जखमी प्रमोदने वलगाव ठाण्यात दाखल तक्रारीतून केला. त्याआधारे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.