esakal | नेहमीप्रमाणे पती पिऊन आला घरी.. पण पत्नीच्या मनात होते भलतेच काही; मग घडला थरार 
sakal

बोलून बातमी शोधा

Wife took extreme step as drunk husband beat her

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील वायगाव (गोंड) येथे पत्नीने पतीच्या नेहमीच्या दारुच्या जाचाला कंटाळून पतीची

नेहमीप्रमाणे पती पिऊन आला घरी.. पण पत्नीच्या मनात होते भलतेच काही; मग घडला थरार 

sakal_logo
By
बादल वाणकर

समुद्रपूर (जि.वर्धा) : एखादी चूकही कधी कोणाचे आयुष्य उद्धवस्त करेल सांगत येत नाही. कोरोनामुळे प्रत्येक जण संकटात सापडला आहे. याचा परिणाम पती आणि पत्नीच्या संबंधांवर होत आहे. कोरोनाच्या महामारीत रोजगार गेल्याने ताण निर्माण होऊन गृहकलह वाढले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना वर्धा जिल्यातील समुद्रपूर तालुक्यात घडली आहे. 

अवश्य वाचा - वेसण तोडून बैल आला घरी आणि बळीराजाने गोठ्याकडे घेतली धाव..नक्की काय घडले?

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील वायगाव (गोंड) येथे पत्नीने पतीच्या नेहमीच्या दारुच्या जाचाला कंटाळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव मुर्लिधर नथ्थू पिचकाटे (वय ५२) असे आहे. तर आरोपी पत्नीचे नाव नंदा मुर्लिधर पिचकाटे असे आहे.

पिऊन करायचा मारहाण 

मुर्लिधर हा नेहमीच दारू पिऊन घरी आल्यानंतर कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याने पत्नी नंदा पिचकाटे हीत्याच्या जाचाला कंटाळली होती. सोमवारी रात्री मुर्लिधरने दारू पिऊन नंदाला मारहाण केली. 

काठीने केले वार 

पतीच्या मारहाणीचा नंदाला राग अनावर झाला आणि तिने जवळच असलेल्या काठीने मुर्लिधर वर काठीने वार केले. यावेळी तो मुर्लिधर पलंगावर पडला असता नंदाने पुन्हा काठीने वार केल्याने मुर्लिधर यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा - तुकाराम मुंढे आतापर्यंत गप्प का होते? असा प्रश्न विचारत गाठले पोलिस स्टेशन

या घटनेची माहिती मुर्लिधर याचा भाचा स्वप्नील घोडे याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून दिली. ल माहिती मिळताच समुद्रपुर पोलिसांना मिळताच उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे, समुद्रपुरचे ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.  आरोपी पत्नी नंदा पिचकाटे हिला अटक केली. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image