नवविवाहितेने घेतली पोलिसांकडे धाव, कारण वाचून व्हाल थक्‍क...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

लग्नानंतर वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवून विवाहितीने सासरी पाऊल ठेवले. मात्र, मधुचंद्राच्या रात्री पतीने शारीरिक संबंध न ठेवल्याने विवाहितेला चांगलाच धक्‍का बसला. तरीही तिने याकडे दुर्लक्ष केले. 

यवतमाळ : उमरसरा येथील तरुणी... व्यवसायाने वकील... तर सिंघानीयानगरातील तरुण... व्यवसायाने डॉक्‍टर... दोघांचा 2019 मध्ये थाटामाटात विवाह सोहळा पार पडला... वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवून तरुणीने सासरी प्रवेश केला... दुसऱ्या दिवशी स्वागतसमारंभ... तिसऱ्या दिवशी मुलीकडे कथा पार पडली... सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर मधुचंद्राची रात्र आली... सासरकडच्यांनी मुलीला मुलाच्या रूममध्ये पाठवले... मात्र, पहाटे तरुणी निराश होऊन रूमच्या बाहेर पडली... 

जिल्ह्यातील उच्चशिक्षित वकील तरुणीचा विवाह कुटुंबीयांनी डॉक्‍टर असलेल्या तरुणासोबत लावून दिला. एक फेब्रुवारी 2019 रोजी आर्णी मार्गावरील एका लॉनमध्ये रितीरिवाजाप्रमाणे विवाह थापाट पार पडला. लग्नानंतर वैवाहिक जीवनाचे स्वप्न रंगवून विवाहितीने सासरी पाऊल ठेवले. मात्र, मधुचंद्राच्या रात्री पतीने शारीरिक संबंध न ठेवल्याने विवाहितेला चांगलाच धक्‍का बसला. तरीही तिने याकडे दुर्लक्ष केले.

कसं काय बुवा? - लॉकडाउनमुळे माहेरीच अडकली विवाहिता, प्रियकराने हितगुज साधण्याचा प्रयत्न केला अन्‌ कुटुंबीयांनी केले असे...

दुसऱ्या दिवशी तरी पती संबंध ठेवेल या आशेवर ती होती. मात्र, दुसऱ्या दिवशीपासून पतीने दुसऱ्या खोलीत झोपने सुरू केले. पतीच्या अशा वागण्याने विवाहितेच्या मनात शंका उपस्थित झाली. तिला आपला पती नपुंसक असल्याचा संशय आला. काही दिवसांतच तिची ही शंका खरी ठरली. नातेवाइकांना ही बाब माहिती असतासुद्धा लपवून ठेवली आणि फसवणूक केली. 

लग्नाच्या आठ दिवसानंतरही पती शारीरिक संबंध प्रस्थापित न करता खेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीवर निघून गेला. यानंतर पाच दिवसांनी विवाहिता देखील एलएलएमच्या शिक्षणासाठी पुणे येथे गेली. एलएलएमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणीने खेड येथे जाऊन पतीच्या वैद्यकीय तपासणीच्या तयारीत होती. त्यापूर्वीच पतीने नोकरी सोडून पळ काढला. तेव्हापासून त्याने पत्नीशी संपर्क साधला नाही. न्यायासाठी विवाहितेने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

विवाहितेला ठार मारण्याची धमकी

विवाहितेचे पुणे येथे शिक्षण सुरू असताना मार्च ते जून महिन्यात पतीकडे खेड येथे आली. यावेळी सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. दरम्यानच्या काळातही पतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाही. तसेच कुणाला काही सांगितल्यास आत्महत्या करेल किंवा तुला ठार मारून टाकील, अशी धमकी दिली. 

सासरच्यांनी दिला चूप राहण्याचा सल्ला

डॉक्‍टर मुलगा नपुंसक असल्याची गोष्ट नातेवाईकांनी लपवून ठेवत वकील तरुणीशे लग्न लावून दिले. मात्र, पतीने शारीरिक संबंध न ठेवल्याने विवाहितेला ही बाब लक्षात आली. तिने याविषयी सासरच्या मंडळींशी चर्चा केली. तेव्हा सासरच्यांनी कुणाशी बोलू नको, आमची समाजात बदनामी होईल, असे सांगून विवाहितेला चूप राहण्याचा सल्ला दिला.

अधिक वाचा - मध्यरात्री नातेवाईक फोने करून म्हणाले, बाळाने जन्मताच सांगितले हाता-पायाला हळद लावल्याने होणार नाही कोरोना!

मैत्रीण, नातेवाईकांशी केली चर्चा

नपुसंक डॉक्‍टर तरुणाशी विवाह लावून दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विवाहितेने मैत्रीण, आई-वडील, बहीण व इतर नातेवाईकांशी चर्चा केली. चार फेब्रुवारीला मधुचंद्राच्या रात्री पतीने अपेक्षित शरीरसंबंध प्रस्थापित केले नाही. यात स्वारस्य नसल्याचे पतीने सांगितल्याचे तिने घरच्यांना सांगितले. यानंतर त्यांनी तक्रार दाखल करण्याचे ठरवले. 

माहेरच्यांना दिली अपमानास्पद वागणूक

वर्षभर विविध कारणाने त्रास सहन केल्यानंतर विवाहितेने पाच नोव्हेंबर 2019 रोजी नातेवाइकांसह सासरच्या घरी गेली. त्यावेळी नातेवाइकांनी अपमानास्पद वागणूक देत विवाहितेला व घरच्यांना घराबाहेर ढकलून दिले. आपली फसवणूक केल्यामुळे सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यासाठी विवाहितनेते अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's complaint against an impotent doctor in Yavatmal