रानडुकराने घेतला मजुराचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने गुराखी रामभाऊ धारणेंवर हल्ला केला. शेतशिवारातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने रानडुकराने तेथून पळ काढला. यावेळी जखमी रामभाऊला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान सायंकाळी सवापाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. 

चिमूर (जि. चंद्रपूर) : वरोरा तालुक्‍यातील गुजगव्हान येथील बकऱ्या चारणाऱ्या गुराख्यावर रानडुकराने हल्ला करून जखमी केल्याची घटना वनपरिक्षेत्र चिमूरअंतर्गत येणाऱ्या गुजगव्हान शेतशिवारात शुक्रवारी (ता. 27) दुपारी बारा वाजतादरम्यान घडली.

जखमी गुराख्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पाच वाजता त्याचा मृत्यू झाला. रामभाऊ किसना धारणे (वय 68, रा. गुजगव्हान) असे मृताचे नाव आहे. 

रानडुकराचा हल्ला 

चिमूर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गुजगव्हान येथील रहिवासी रामभाऊ किसना धारणे यांचा बकऱ्या पाळण्याचा व्यवसाय आहे. रोजच्याप्रमाणे ते सकाळी बकऱ्या घेऊन चारण्यासाठी गावाजवळील शिवारात गेले. दरम्यान दुपारी बारा वाजता राजेश्वर राजनहिरे यांच्या शेतात ते बकऱ्या चारत होते. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने रामभाऊवर हल्ला केला. 

क्‍लिक करा :  ही आहे बाहुबली मांजर... जाणून घ्या हिची खासियत
 

शेतकऱ्यांची आरडाओरड 

तेव्हा शेतशिवारातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने रानडुकराने तेथून पळ काढला. यावेळी जखमी रामभाऊला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान सायंकाळी सवापाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती चिमूर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना देण्यात आली. 

जाणून घ्या : तो पंचावन वर्षांचा ती नऊ वर्षांची अन्‌...

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा 

वृत्त लिहीपर्यंत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली नाही. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आजवर अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wild boars attack; men death at chimur