esakal | बेलफूल विकणारी आजी घरी परतलीच नाही, खून केल्याचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बेलफूल विकणारी आजी घरी परतलीच नाही, खून केल्याचा संशय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि.यवतमाळ) : आरेगाव येथील बेलफूल वाटणारी वृद्ध महिला गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होती. आज बुधवारी अखेर तिचा ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला असून अज्ञात चोरट्याने सोन्या व चांदिचे दागिने हिसकावून घेऊन खून (yavatmal crime) केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

पुसदपासून आठ किलोमीटर अंतरावरील आरेगाव येथील यशोदाबाई कोंडबा सातव(वय ६० वर्षे)ही विधवा महिला दररोज लोणी या गावात बेलफुल वाटायची. सोमवार दरम्यान भरपूर पाऊस पडत असल्याने काही काळ लोणी येथे थांबली व पावसाने उघडीप देताच आपल्या गावाकडे निघाली. परंतु, दोन दिवसांपासून ही महिला घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. अखेर त्या महिलेचे प्रेत महादेव मंदिरालगत असलेल्या जोडरस्त्यावरील संजय चिद्दरवार यांच्या शेतात बुधवारी आढळून आले. महिलेच्या गळ्यात असलेले सोन्याची पाने, हातातील चांदीचे कडे व पाटल्या अज्ञात चोरट्याने हिसकावून घेऊन तिचा पाय बांधला आणि खून केला असल्याचा संशय प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तिच्या पश्चात एक विवाहीत मुलगी असून घटनास्थळी शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे.

loading image
go to top