
साळवा : कुही तालुक्यातील खरबी शिवारात पडून असलेल्या विद्युत तारांना स्पर्श झाल्याने पुष्पा सखाराम वैद्य यांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.