सकाळची सहाची वेळ...जंगलात ती मोहफुले वेचत होती आणि वाघाने...

mamata
mamata

पवनी(जि.भंडारा) : पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरला वनक्षेत्र कक्षात मोहफुले गोळा करण्यासाठी गेलेल्या सावरला येथील ममता नरेश शेंडे(वय 35) या महिलेवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना आज सकाळी 6 च्या सुमारास घडली आहे.
  सावरला येथील ममता शेंडे व तिचा पती नरेश शेंडे हे दोन्ही सावरला वनक्षेत्रातील कक्षात पहाटे पाचच्या सुमारास मोहफुल गोळा करण्यासाठी गेले होते. मोहफुल गोळा करीत असताना 6 च्या सुमारास दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक ममता वर झडप घातली. या झडपीत ममता ठार झाली. जवळच असलेल्या पतीने आरडा ओरड केल्याने वाघाने जंगलात पळ काढला.
संपूर्ण देशात कोरोना विषाणूची दहशत असून केंद्र व राज्य सरकारने लॉक-डॉऊन केले आहे परंतु तालुक्यातील अनेक भागात पोटाची खळगी भरण्यासाठी काही ग्रामवासी संचारबंदीच्या काळातही  मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात जात आहेत. तालुक्यातील सावरला वन क्षेत्रात काही महिन्यापासून वाघाची दहशत पसरली आहे गेल्या आठवड्यात दोन तरुणांवर वाघाने हल्ला केला होता परंतु सुदैवाने त्यांनी पळ काढून स्वतःचा बचाव केला.

वनविभागाने  काल रात्री सावरला व त्या परिसरातील ग्रामीण भागामध्ये वाघाची दहशत असल्यामुळे  जंगलात जाणे टाळावे असे निर्देश दिले होते.परंतु गावकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या घटनेला समोर जावे लागले आहे.घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केला आहे ममताच्या कुटूंबात मुलगा,मुलगी व पती असा परिवार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com