esakal | विवाहीत महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime_women

विवाहीत महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्वी (जि. वर्धा) : शहरातील दोन मुलींची आई असलेल्या ३५ वर्षीय विवाहीत महिलेवर २४ वर्षीय तरुणाने बलात्कार (arvi physical abused case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामधून महिला आठ महिन्याची गर्भवती झाली. त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी (arvi police wardha) आरोपीला अटक करून बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा: अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, हरीश किंधरले (२४ वर्ष), असे आरोपीचे नाव असून तो दाऊत नगरचा रहिवासी आहे. आरोपी आणि पीडित महिला दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. त्यामाध्यमातून त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली. हळूहळू दोघांमधील संवाद वाढला. हरीशने पीडित महिलेचा विश्वास संपान केला. जानेवारीमध्ये तिला पुलगावला घेऊन गेला. येथील एका लॉजमध्ये तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. यानंतर बदनामी करण्याचा धाक दाखवून शहरातील संतोषी माता मंदिरालगतच्या सुनसान जागेवर बोलावून अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अशात पीडितेला गर्भधारण झाली. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तातडीने तपास सुरू करून आरोपी हरीष किंधरले याला अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक वंदना सोनोने, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, योगेश चाहेर, देवानंद केकन यांनी ही कारवाई केली.

loading image
go to top