गडचिरोली : महिला पोलिस शिपायाची आत्महत्या, परिसरात हळहळ

Woman Police Suicide Gadchiroli
Woman Police Suicide Gadchirolie sakal
Updated on: 

गडचिरोली : गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police) वसाहतीत राहत असलेल्या महिला पोलिस शिपायाने (Woman Police Suicide Gadchiroli) विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Woman Police Suicide Gadchiroli
इंग्रजीने घेतला जीव, इंग्रजी नको म्हणत विद्यार्थिनीची आत्महत्या, पाहा व्हिडीओ

प्रणाली काटकर (वय ३५) असे मृत महिला पोलिस शिपायाचे नाव आहे. मृत महिला पोलिस शिपाई प्रणाली काटकर गडचिरोली मुख्यालयात दोन वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांचे लग्नही पोलिस शिपाई संदीप पराते यांच्याशी दोन वर्षांपूर्वी झाले होते. ते सुद्धा गडचिरोली मुख्यालयात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे प्रणाली काटकर या संदीप पराते यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. या दोघांत सातत्याने वाद व्हायचे. शनिवारी देखील दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानं प्रणाली काटकर यांनी टोकाची भूमिका घेऊन विष प्राशन केले. त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच पती संदीप पराते यांनी त्यांना लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पूनम गोर्हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Open drains and stagnant wastewater raise sanitation concerns at Gadchiroli District General Hospital.
Gurudev Seva Mandal Clarification
Devotees gather at Gurukunj Mozari during the 58th death anniversary event of Rashtrasant Tukdoji Maharaj.
Sant Tukdoji Maharaj