'दीदी तुम्हारे नोट फटे है' असं म्हणत भुरट्यांनी केली चोरी; अखेर महिलेनं दाखवली दबंगगिरी

 'दीदी तुम्हारे नोट फटे है' असं म्हणत भुरट्यांनी केली चोरी; अखेर महिलेनं दाखवली दबंगगिरी

गिरड (जी. वर्धा) : 'दीदी तुम्हारे नोट फटे है! असे म्हणत हातचालखीने नोटा गायब करून दुचाकीवरून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या भुरट्या चोरास (Thieves at bank) धाडसी महिलेने धावत जात चोराला जोरदार धक्का देत खाली पाडले व तरुणांच्या मदतीने पोलिसांच्या (Wardha police) स्वाधीन केले. मात्र दोन चोरटे पसार झाले. शुक्रवारी ( ता. चार ) दुपारी गिरडच्या भारतीय स्टेट बँकेत हा प्रकार घडला. (Woman push and stop thieves in wardha)

 'दीदी तुम्हारे नोट फटे है' असं म्हणत भुरट्यांनी केली चोरी; अखेर महिलेनं दाखवली दबंगगिरी
Video : उपराजधानी हादरली! बंदुकीच्या धाकावर दोन तास कुटुंब ओलीस; आरोपीला सिनेस्टाईल अटक

सदर भुरट्या चोराचे नासीर आमिर अली ( वय ४०) वर्ष नाव असल्याची माहिती ठाणेदार सुनील दहिभाते यांनी दिली.

गिरड येथील रसिका लक्ष्मण पडवे यांनी शेतीसाठी बि बियाणे खत घेण्यासाठी बँकेतून 25 हजार रुपये काढले. आणि बँकेच्या आवारात बसून पैश्याची खात्री करीत असतांना पाहून दीदीं तुम्हारे पास के कुछ नोट फटे हुये है असे म्हणत महिलेच्या हातून पैसे घेत चोरट्याने मोजले. आणि पैश्याची खात्री करून महिलेच्या हाती पैसे दिले. आणि चोरटा तेथून निघाला. दरम्यान महिलेने नोटाची खात्री केली असता 500 च्या 50 नोटापैकी 21 नोटा कमी आढळल्या.

यावेळी जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीना नोटा मापणाऱ्या इसमाविषयी विचारणा केली असता रस्त्याकडे गेल्याचे सांगितले. दरम्यान महिलेला हा चोरटा गिरड चौकातील सिर्सीकडे जाणाऱ्या मार्गावर दिसला. लगेच ही महिला चोरट्याकडे धावत जात असतांना चोरटा सोबतच्या सहकारी चोरट्याच्या स्कुटीवर बसण्याच्या तयारीत होता.

 'दीदी तुम्हारे नोट फटे है' असं म्हणत भुरट्यांनी केली चोरी; अखेर महिलेनं दाखवली दबंगगिरी
'देशातील OBC समाजाचं नुकसान करण्याचं काम भाजपचं'; नाना पटोले यांचं टीकास्त्र

यावेळी महिलेने धाडस करून स्कुटीवर धकावले. त्यामुळे हा चोरटा जमिनीवर पडला. स्कुटीवरी दोन चोरटे पोबारा होण्यास यशस्वी ठरले. दरम्यान गावातील युवक राकेश दीक्षित जवळ असता महिलेने हकीकत सांगितली.यावेळी गावातील युवकांनी चोरट्याला पकडून महिलेकडील पैशाची खात्री केली. यावेळी चोरट्याने 500 च्या 21 नोटा परत केल्या.यावेळी राकेश दीक्षित यांनी फोन करून पोलिसांना घटनास्थळी बोलावून या अपंग चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

(Woman push and stop thieves in wardha)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com