त्याच्या पाठोपाठ तिनेही घेतला जगाचा निरोप.... 

Suicide
Suicide

धामणगावरेल्वे (जि. अमरावती)  : तालुक्‍यातील मंगरूळ दस्तगीर येथील पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या युवकाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच याप्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्या महिलेनेसुद्धा आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली आली आहे. 

वाठोडा येथील प्रमोद माधवराव मेंढे (वय 32) या युवकावर तीन दिवसांपूर्वी मंगरूळदस्तगीर पोलिस ठाण्यात विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या युवकाने सोमवारी (ता.27) शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

दुसरीकडे या घटनेतील फिर्यादी महिला एका गिरणीत कामाला होती. मंगळवारी, 28 जुलै रोजी सकाळी नेहमीप्रमाणे सदर महिला सूतगिरणीत कामाला गेली. मात्र, दुपारी बारा वाजताच्या सुमारास गोळी घेऊन येते, असे म्हणून ती महिला परिसरात असलेल्या वसाहतीमधील स्वतःच्या घरी गेली. दरम्यान, एक तास उलटूनसुद्धा ती परत न आल्याने सूतगिरणीच्या सुरक्षारक्षकाने तिच्या खोलीवर जाऊन पाहिले असता ती महिला घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. 

घटनेचे वृत्त कळताच दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता धामणगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मृत महिला चांदूररेल्वे तालुक्‍यातील एका गावातील रहिवासी होती.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com