हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती, महीलेवर अत्याचार करून हत्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

बुलढाणा जिल्ह्यात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे ५५ वर्षीय महीलेची बलात्कार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

संग्रामपूर (जि.बुलडाणा)  : हैदराबादच्या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडवून टाकली. वासनांध नराधमांनी एका 55 वर्मषीय महिलेवर बलात्कार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे शनिवारी सकाळच्या सुमारास एका 55 वर्षीय महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत दिसले.  सदर महिला ही खेर्डा येथील असून तिच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.  या महीलेची 7 डिसेंबरच्या रात्री हत्या करून प्रेत निर्वस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर विवाहीत महीलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची माहिती घटनेवरून समजत आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. 

 

शहर असो किंवा गाव, आजच्या महिला कुठेही सुरक्षित नाहीत. मग मनात राहून राहून एकच प्रश्न निर्माण होतो. याला जबाबदार कोण? सरकार, पोलिस की समाज? आधी दिल्लीतील अत्याचाराचे प्रकरण घडले. त्यानंतर आंदोलने झाली. नंतर कोपर्डीचे प्रकरण आणि नुकतीच घडलेले हैद्राबाद प्रकरण. किती भयानक आहे हे सगळे? एकापाठोपाठ कित्येक महिलांवर अत्याचार होत आहेत. स्त्री ही स्वभावत:च सोशिक, घाबरट, भिडस्त असल्याने आपण तिच्यावर अत्याचार केला, तर ती आवाज उठवणार नाही, अशी खात्री असे कृत्य करणाऱ्यांना वाटत असल्याने सातत्याने अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman tortured and murdered