esakal | हृदयद्रावक! सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg

सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील विवाहिता 17 मे ला मध्यरात्री दोन चिमुकल्यांसह शौचालयाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतर ती परत आली नसल्याचे पाहून परिवारातील सदस्यांनी तिचा शोध घेतला.

हृदयद्रावक! सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दुसरबीड (जि.बुलडाणा) : कोरोना व्हायरसचा एकीकडे प्रभाव तर दुसरीकडे कलह आणि घटनांचे सत्र अशा दुहेरी संकटामुळे जिल्हा हादरत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू सोमवारी झाला. तर, (ता.19) दुसरबीड येथे विवाहितेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील विवाहिता 17 मे ला मध्यरात्री दोन चिमुकल्यांसह शौचालयाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतर ती परत आली नसल्याचे पाहून परिवारातील सदस्यांनी तिचा शोध घेतला परंतु, ती आढळून आली नाही. दरम्यान, आज (ता.19) सकाळी सदर महिलेचा मृतदेह चिमुकल्यासह विहिरीत आढळून आल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. 

आवश्यक वाचा - Video : अखेर पोलिसांनी डागली कारवाई तोफ, बेकायदेशीर सुरू होता हा व्यवसाय

गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असलेली विवाहिता आज (ता.19) चिमुकल्यासह विहिरीत मृत अवस्थेत आढळल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ निर्माण होऊन परिवारातील सदस्यांनी एकच टाहो फोडला. सुखी संसार अचानक विस्कटल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील स्वाती अमोल जगदाळे (वय 28) विवाहिता 17 मे ला उत्तररात्री 1 वाजेदरम्यान, 11 वर्षीय मुलगा गणेश व 9 वर्षीय मुलगी मयूरी यांना शौचाला नेते म्हणून घरातून बाहेर गेली होती. बर्‍याच वेळ होऊनही ती परतली नाही. म्हणून कुटुंबीय व इतरांनी रात्रभर तसेच 18 मे ला दिवसभर तिघांचाही प्रत्यक्ष तसेच संपर्काद्वारे शोध घेतला. मात्र तिघेही कुठेही आढळून आले नाहीत. 

(ता.19) सकाळी 6.30 वाजेदरम्यान, दुसरबीड गावानजीक मेहकर मार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यासंदर्भात माहिती कळताच किनगावराजा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पती अमोल भगवान जगदाळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदखेडराजा येथे पाठविण्यात आले आहेत. सदर आत्महत्येबाबत नेमके कारण काय हे वृत्तलिहेपर्यंत कळू शकले नाही.

loading image
go to top