त्या महिलांचा दुर्गावतार! चक्क दारू विक्रेत्यावरच हल्लाबोल

daroo.
daroo.

आरमोरी (गडचिरोली): दारुचा सर्वाधिक त्रास होतो तो महिलांना. त्यामुळे देलोडा येथील महिलांनी दारू विक्रेत्याविरुध्द एल्गार पुकारला. तालुक्‍यातील देलोडा (बु) येथे गाव संघटनेच्या महिलांनी मोहफुलाची दारू तस्करी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करीत त्याच्याकडची पाच लिटर मोहफुलाची दारू जप्त केली.

एक व्यक्ती सूर्यडोंगरीमार्गे मोहफुलाची दारू विक्री करण्यासाठी आणत असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यावरून एका जणाची तपासणी केली असता त्याच्याकडे ५ लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. घटनास्थळावर पोलिस पाटील यांना बोलावून पंचनामा करण्यात आला.
सूर्यडोंगरी येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्रेते आहेत. यामुळे दारूबंदी असलेल्या गावांतील मद्यपी या गावाकडे धाव घेत असतात. देलोडा (बु) येथे गाव संघटनेच्या महिलांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे वर्षभर दारूबंदी कायम होती. मात्र, पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे सुरू झाल्यामुळे गाव संघटनेच्या महिला व्यस्त झाल्या. ही संधी साधत अनेक दारूविक्रेत्यांनी छुप्या मार्गाने दारूविक्री सुरू केली. त्यामुळे गावातील मद्यपींना पुन्हा सहजतेने दारू उपलब्ध होऊ लागली.

सविस्तर वाचा - सहा वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातुन खून

परिणामी कुटुंबाचे आर्थिक नियोजन बिघडत असून महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. गाव संघटनेच्या महिलांनी गावातील दारूविक्रीवर बंदी घालण्यासाठी अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार देलोडा (बु) - सूर्यडोंगरी मार्गावर गस्त घातली असता गावात विक्री करण्यासाठी दारू आणत असल्याचे निदर्शनास आले. महिलांनी त्या व्यक्तीला अडवून त्याच्याकडून ५ लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. महिलांनी जप्त दारू व दारूविक्रेत्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठरविले. मात्र, पूर परिस्थिती असल्यामुळे पोलिस स्टेशन गाठता आले नाही. त्यामुळे घटनास्थळावर गावातील पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष यांना बोलावून पंचनामा करण्यात आला. गाव संघटनेच्या ताब्यात असलेला जप्त मुद्देमाल पुराचे पाणी उतरताच पोलिसांच्या स्वाधीन केला जाणार आहे. महिलांच्या या कृतीमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com