सुरजागड खाणीतील ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

सुरजागड खाणीतून लोह खनिज भरून येणार्‍या ट्रकने आलापल्ली मार्गावर दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली.

सुरजागड खाणीतील ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार

गडचिरोली - सुरजागड खाणीतून लोह खनिज भरून येणार्‍या ट्रकने आलापल्ली मार्गावर दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली. तिचा पतिला किरकोळ जखमी झाला आहे. मात्र ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.

सुरजागड-आलापल्ली मार्गावर सुरजागड लोह खनिज घेऊन येणारे शेकडो ट्रक दिवस-रात्रौ येत असतात. मंगळवार (ता. २७) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास सुराजगडवरून लोह खनिज घेऊन येणार्‍या ट्रकने आलापल्लीकडे जाणार्‍या दुचाकीला ठोस दिल्यामुळे सुभाष जमदार यांची पत्नी बिजोली जमदार जागीच ठार झाली. या घटनेची माहीती गावकर्‍यांना कळताच अनेकांनी घटनास्थळ गाठले. ज्या ट्रकने अपघात घडला तो ट्रक संतप्त जमावाने पेटवला. घटना स्थळाजवळ आणखी काही ट्रक आले असता संतप्त जमावाने तेही पेटवून दिल्याची माहिती मिळाली आहे. सुरजागड लोह खाणीतून लोह खनिज भरलेले व आष्टीवरून सुरजागडकडे जाणारे रिकामे ट्रक, असे एकूण ११ टूक संतप्त जमावाने पेटवून दिल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संतप्त जमावाला पांगविण्याचा काटोकाट प्रयत्न केला.