esakal | किमान वेतन द्या हो! महिलांनी जोडले थेट त्यांच्यापुढे हात 
sakal

बोलून बातमी शोधा

Woman workers

शासकीय विभागात काम करणाऱ्या राज्यातील हजारो महिला कंत्राटी कामगारांना नियमानुसार किमान वेतन, नियमित पगार व योग्य वागणूक मिळत नाही.

किमान वेतन द्या हो! महिलांनी जोडले थेट त्यांच्यापुढे हात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर  : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्या महिलांनी रविवारी (ता. 8) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेसमोर प्रार्थना केली. कंत्राटी कामगारांना किमान वेतन, नियमित पगार आणि चांगली वागणूक मिळावी, अशी मागणी केली. 

शासकीय विभागात काम करणाऱ्या राज्यातील हजारो महिला कंत्राटी कामगारांना नियमानुसार किमान वेतन, नियमित पगार व योग्य वागणूक मिळत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील महिलांच्या आंदोलनाने एक वर्षापूर्वी किमान वेतनाच्या निधीला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला कामगारांनी एक वर्षापूर्वी बेमुदत उपोषण केल्यानंतर गेल्या महिला दिनी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे 500 कामगारांसाठी पगारापोटी निधीमध्ये चार कोटी 50 हजार 47 हजार 928 रुपयांची वाढ शासनाने केली. त्यातील 9 कोटी 37 लाख 19 हजार 228 रुपये निधी मंजूर केला होता. मात्र, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी किमान वेतनाच्या दरापेक्षा कमी दराच्या अपात्र निविदेला पात्र ठरविल्याने कामगारांना एक वर्षापासून किमान वेतन मिळाले नाही. त्यामुळे महिला कामगारांनी जानेवारीपासून आंदोलन सुरू केले. 

अवश्य वाचा- गाव लई न्यारं... महिला खुर्चीवर बसून पितात चहा, अन् पतीला म्हणतात...

फोटोंसमोर केली सामूहिक प्रार्थना

गेल्या 45 दिवसांपासून जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात महिला कामगारांचा संघर्ष सुरू आहे. रविवारी महिला दिनी आंदोलन मंडपावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. या प्रतिमांसमोर रांगोळी काढण्यात आली. जागतिक महिलादिनानिमित्त शुभेच्छा, राज्यातील कंत्राटी महिला कामगारांना किमान वेतन, नियमित पगार व योग्य वागणूक देण्यात यावी, असा मजकूर रांगोळीद्वारे या ठिकाणी लिहिण्यात आला. यानंतर सामूहिक प्रार्थना करण्यात आली.