सहस्त्रकुंड धबधब्यात तीन महिला बुडाल्या; दोघींना वाचवण्यात यश; एक बेपत्ता

अरविंद ओझलवार 
Saturday, 10 October 2020

एका तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन त्या दोन मुलीचे जीव वाचवले. पण त्या मुलीची आई वाहुन गेल्याने महिलेचा शोध लागला नाही. विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली गावाजवळील सहश्रकुंड येथे घडली आहे.

उमरखेड, (जि. यवतमाळ) :पैनगंगा नदीवरील मुरली येथील बंधाऱ्याचे पाणी अचानक सोडण्यात आल्यामुळे सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी आलेल्या एका महिला पर्यटकासह दोन मुली वाहुन गेल्याची घटना शनिवारी (ता. १०) दुपारी चार दरम्यान घेतली. यातील दोन मुलींना वाचविण्यात यश आले एक महिला मात्र बेपत्ता झाली आहे. प्रशासन तिचा शोध घेत आहे. 

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

एका तरुणाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारुन त्या दोन मुलीचे जीव वाचवले. पण त्या मुलीची आई असलेल्या महिलेचा शोध लागला नाही. विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली गावाजवळील सहश्रकुंड येथे घडली आहे. यवतमाळ येथील पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापक हे आज शनिवार सुटीचा दिवस असल्याने सहकुंटूब सहपरिवारासह सहश्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आले होते. 

विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली ता. उमरखेड येथे आले होते. सर्व कुंटूब नदीकाठी उभे आंनद घेत असताना या पैनगंगा नदीवर मुरली गावाच्या वरच्या बाजुने उच्च बंधा-यातिल अचानक पाणी सोडण्यात आल्याने, नदीच्या पाण्याची पातळी वाढली.

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

त्यात ममता संतोष कुमार व तीच्या दोन मुली वाहुन जात असतांना आरडाओरड केल्याने, मुरली गावातिल  संदीप राठोड या तरुण मुलाने जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेउन त्यांच्या दोन मुलींना वाचवण्यात यश मिळाले,पण मुलींच्या आईचा शोध लागला नाही, शोध मोहीम चालु आहे अशी माहिती सहस्रकुंड येथील महादेव मंदिर ट्रस्टचे सचिव सतिश वाळकीकर यांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women sink in Sahastrakund waterfall