esakal | कामगार आयुक्त कार्यालयावर कामगारांची धडक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कामगार आयुक्त कार्यालयावर कामगारांची धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : पंचायत समिती अंतर्गत 3,900 लाभार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मात्र, आजपर्यंत केवळ 1,400 लाभार्थ्यांच्या पावत्यांचा हिशेब उपायुक्त कामगार कार्यालयाकडे पाठविला. यामुळे उर्वरित पावत्यांमध्ये घोळ झाल्याचा संशय व्यक्त करीत ओबीसी छावा संग्राम परिषदेतर्फे कामगार आयुक्त कार्यालयावर धडक देण्यात आली. तसेच पंचायत समिती सभापतींना घेराव घालून हिशेबाची विचारणा केली.
सध्या कामगारांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. कामगारांकडून नोंदणीचे 85 रुपये घेतले जाते. मात्र, नोंदणी करणारे कर्मचारी सर्रास 200 रुपये वसूल करीत आहेत. भंडारा पंचायत समिती अंतर्गत कामगार कार्यालयाकडून 3,900 कामगारांची नोंदणी करण्यात आली. मात्र, आजपर्यंत 1,400 कामगारांची माहिती गोळा झाली आहे. खिडकीवर रांगेत असताना केवळ 50 कामगार नोंदणी होत असून उर्वरित पावत्या बाहेर जावून फाडल्या जात आहेत. या विरोधात कामगार आयुक्त कार्यालयाला महिला व पुरुषांनी घेराव घातला. यानंतर पावतीचा हिशेब घेण्यासाठी पंचायत समितीला धडक देऊन सभापतींना घेराव केला. यावेळी पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी पळ काढल्याने कामगार रात्रभर तळ ठोकून बसले होते. या आंदोलनादरम्यान कामगारांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. प्रशासनाने पावत्यांचा हिशेब न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी छावा संग्राम परिषदेने दिला आहे.

loading image
go to top