घरी परतण्यासाठी मजूर करताहेत जीवघेणी कसरत

निलेश झाडे
Monday, 4 May 2020

तेलंगणात अडकून पडलेले मजूर हजारोंच्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या पोडसा येथे मजूरांची घरी परतण्यासाठी जत्रा भरलेली आहे. या मजूरांना खाजगी वाहनांनी त्यांच्या गावी पोहचविल्या जात आहे. वाहनांची कमतरता असल्याने एका ट्रक्‍टरला दोन ट्रॉल्या लावून मजूरांना नेले जात आहे.

धाबा (जि. चंद्रपूर) : दिवसेंदिवस कोराना रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे.त्यामुळे देशात लॉकडाऊनचा कालावधीही वाढविला जात आहे. अचानक आलेल्या या आरोग्य आणीबाणीमुळे अनेकजण घरापासून दूर अडकले आहेत.त्यामध्ये मजूर, कामकरीवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढत चालल्यामुळे ही मंडळी जवळपास दोन महिन्यांपासून घरापासून दूर आहेत. जवळचा पैसाही संपला आहे. त्या सगळ्यांना आता घरी परतण्याचे वेध लागले आहेत.              शेतीकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक मजूर तेलंगणात गेले आणि तिथेच अडकले. त्यांना त्यांच्या गावी जाऊ देण्यात यावे, असे आदेश आल्यामुळे प्रशासन तशी व्यवस्था करण्यात गुंतले आहे, मात्र मजुरांच्या संख्येच्या तुलनेत व्यवस्था तोकडी पडते आहे आणि कोरानाच्या प्रसाराचा धोका वाढतो आहे.
तेलंगणात अडकून पडलेले मजूर हजारोंच्या संख्येने चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर असलेल्या पोडसा येथे मजूरांची घरी परतण्यासाठी जत्रा भरलेली आहे. या मजूरांना खाजगी वाहनांनी त्यांच्या गावी पोहचविल्या जात आहे. वाहनांची कमतरता असल्याने एका ट्रक्‍टरला दोन ट्रॉल्या लावून मजूरांना नेले जात आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक मजूरांचा प्रवास होत असला तरी हा प्रवास जिवघेणा ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

लॉकडाऊन देशात कायम असले तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले हजारो मजूर चंद्रपूर जिल्ह्यात आले. गोंडपिंपरी तालुक्‍यातील पोडसा पुलावरून हे सर्व मजूर चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. पोडसा येथे हजारोचा संख्येने मजूर गोळा झाले आहेत. खाजगी वाहनांनी हे मजूर गाव गाठत आहेत. मात्र वाहनांची कमरतरता असल्याने एका ट्रॅक्‍टरला दोन ट्रॉल्या जोडून या मजूरांना नेले जात आहे. या कसरतीने एकाच वेळी जास्त संख्येने मजूर प्रवास करीत असले तरी हा प्रवास जीवघेणा ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान आज पहाटेपासून तेलंगणातून येणाऱ्या मजूरांचा ओघ सुरूच आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers trying to reach home