काँग्रेसच्या कार्याध्यक्षा म्हणतात, शरद पवारांना मुख्यमंत्री करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

यशोमती ठाकूर म्हणाल्या, की शरद पवारांना मुख्यमंत्री केल्यास आमचा पाठिंबा असेल. शिवसेना-भाजपने भांडण सोडून शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. अन्यथा सरळ शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा आम्ही काँग्रेसवाले त्यांच्यासोबत जाऊ.

अमरावती : शरद पवार हे अनुभवी व्यक्ती आहेत. सध्या महाराष्ट्राचे हाल होत असून, ते बघवत नाहीत. त्यामुळे शरद पवारांसारख्या व्यक्तीकडे महाराष्ट्राची धुरा द्यावी, असे मत महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

भाजप-शिवसेना सत्तास्थापनेचा तिढा अद्याप मिटलेला नाही. एकीकडे राष्ट्रवादीने आपण विरोधातच बसणार असल्याचे म्हटले असले तरी शरद पवार आज (सोमवार) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणे पाहायला मिळतात की काय अशी चर्चा आहे. 

विधानसभा अध्यक्ष शिवसेनेचा?

यशोमती ठाकूर म्हणाल्या, की शरद पवारांना मुख्यमंत्री केल्यास आमचा पाठिंबा असेल. शिवसेना-भाजपने भांडण सोडून शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. अन्यथा सरळ शरद पवारांना मुख्यमंत्री बनवा आम्ही काँग्रेसवाले त्यांच्यासोबत जाऊ. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने द्या. भाजप-शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरुन वाद होत आहे. हा वाद थांबवून आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्या.

लग्न ठरवायच्या बैठकीतच यांची एवढी भांडण, मग पुढे काय?: रोहित पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashomati Thakur says make Sharad Pawar CM