esakal | सोयाबीन कापणीसाठी जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

सोयाबीन कापणीसाठी जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साखरी (जि. यवतमाळ) : सोयाबीन कापणीसाठी जाणाऱ्या मजुराचे वाहन उलटल्याने, यात एक जण ठार, तर तिघे जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. ४) पहाटेच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यात घडली. किशोर नकटू झबाडे (वय २८) असे मृत मजुराचे नाव आहे. नवनाथ भोयर, प्रकाश गेडाम आणि जयराम झबाडे अशी जखमींची नावे आहेत. मागील आठवड्यात सोयाबीन कापणीसाठी घेऊन जाणारे एक वाहन सावलीजवळ उलटले होते. त्यात एक ठार व तेरा जण जखमी झाले होते.

सध्या सोयाबीन कापणी सुरू आहे. कापणीसाठी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडात जात आहेत. हरंबा येथील काही मजूर रविवारी यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन कापणीसाठी निघाले होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास एमएच ३४ डी ३-०१५३ क्रमांकाच्या टाटा एस वाहनाने किशोर झबाडे, नवनाथ भोयर, प्रकाश गेडाम आणि जयराम झबाडे यवतमाळ जिल्ह्याकडे निघाले होते.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

यवतमाळजवळ वाहन पोहोचत असतानाच चालकाचा डोळा लागला. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, वाहन उलटले. यात किशोर झबाडे या गंभीर जखमी झाला, तर नवनाथ भोयर, प्रकाश गेडाम आणि जयराम झबाडे हे किरकोळ जखमी झाले. उपचारादरम्यान किशोर नकटुजी झबाडे याचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

loading image
go to top