आता चालणार नाही मनमानी, यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढला हा महत्त्वाचा आदेश...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

गावस्तरीय समिती विदेशातून, इतर राज्यातून व इतर जिल्ह्यातून असलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेऊन माहिती सादर करतील. तसेच अत्यावश्‍यक कामाशिवाय गावातून कुणीही बाहेर जाणार नाही यावर लक्ष देणे. विदेशातून, इतर महानगरातून गावात आलेल्या लोकांची माहिती तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांना देणे. याशिवाय या सर्व लोकांना किमान 14 दिवसांसाठी त्यांचे राहते घरी विलगीकरण करून ठेवणे. विलगीकरण करण्यास नकार दिल्यास अशा व्यक्तींची नावे तहसील कार्यालयात सादर करणे.

यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्‍टर यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी वरिष्ठांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. नागरिकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावस्तरावर समितीचे गठण करण्यात आले आहे. यात तलाठी समितीचे अध्यक्ष असून पोलिस पाटील सदस्य सचिव आहेत.

गावस्तरीय समिती विदेशातून, इतर राज्यातून व इतर जिल्ह्यातून असलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेऊन माहिती सादर करतील. तसेच अत्यावश्‍यक कामाशिवाय गावातून कुणीही बाहेर जाणार नाही यावर लक्ष देणे. विदेशातून, इतर महानगरातून गावात आलेल्या लोकांची माहिती तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांना देणे. याशिवाय या सर्व लोकांना किमान 14 दिवसांसाठी त्यांचे राहते घरी विलगीकरण करून ठेवणे. विलगीकरण करण्यास नकार दिल्यास अशा व्यक्तींची नावे तहसील कार्यालयात सादर करणे.

कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक

गावात अत्यावश्‍यक सेवा जसे किराणा माल, अन्नधान्य दुकाने, पिण्याचे पाणी, मेडीकल, डॉक्‍टरची दवाखाने चालू राहतील, याची खात्री समितीच्या सदस्यांनी करावयाची आहे. भाजीपाला, फळे घरपोच देण्यासाठी नियोजन करणे, जीवनावश्‍यक वस्तू वगळता पान टपऱ्या, कोल्ड्रिंक्‍स, आईस्क्रीम ही सर्व ठिकाणे बंद ठेवणे. सर्व राशन दुकाने सुरू ठेवणे. दूध डेअरीवर गर्दी न होता दोन व्यक्तीमध्ये एक मीटरचे अंतर ठेवून लोकांना दूध उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे. अत्यावश्‍यक सेवांच्या सर्व ठिकाणांवर हात धुण्याची व्यवस्था ठेवणे. गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांवर हात धुण्याची व्यवस्था ठेवणे. गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून त्यांचे निर्जंतुकीकरण करून घेणे. कोरोना विषाणू संशयित व्यक्तीची माहिती तालुका समितीला कळवावी लागणार आहे.

अवश्य वाचा- मानवी संरक्षणासाठी लावले होते तारेचे कुंपण, अडकला मात्र बिबट आणि....

कायदेशीर कार्यवाहीचे निर्देश

बाहेर राज्यातून, शहरातून आलेला व्यक्ती बाहेर फिरणार नाही, याची दक्षता घेणे. बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी, आवश्‍यकता असल्यास कायदेशीर कार्यवाही पण करण्यात यावी. ज्यांची प्रकृती ठीक नाही, ज्यांना कोविड सदृश लक्षणे आढळून येतात. त्यांना त्वरित नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविणे आदी कामांबाबत समिती कार्यरत राहणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal collector issued important order