

Yavatmal
esakal
यवतमाळ: शहरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमीष दाखवून ऑटोचालकाने वारंवार अत्याचार केला. परंतु, लग्न करण्यास नकार दिला. या प्रकारामुळे अत्याचारग्रस्त मुलीने गुरुवारी (ता. 25) अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ऑटोचालकाविरोधात गुन्हा नोंद केला. जीत सरगर (वय 19, रा. सायखेडा, केळापूर), असे आरोपी ऑटोचालकाचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.