Fake Birth-Death Records Exposed
esakal
चेतन देशमुख
यवतमाळ : अवैध विलंबित जन्म, मृत्यू नोंदी रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरु असताना आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीच्या सॉफ्टवेअरमध्ये जन्माच्या 27 हजार 398 नोंदी आढळून आल्या. ग्रामपंचायतीचा आयडी मुंबईत मॅप झाला असून नोंदी सायबर फ्रॉडअंतर्गत झाल्याचा सशंय आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी मंगळवारी (ता. 16) शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.