Yavatmal : शेतकरीच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yavatmal

Yavatmal : शेतकरीच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको

आर्णी : शेतकरीहिताच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून बुधवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात हातात पेटती मशाल घेऊन शिवसैनिकांनी दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. यावेळी मार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागपूर-तूळजापूर महामार्गावरील आर्णीतील दत्तारामपूरजवळील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले.

अनुदान देण्याची घोषणा झाली. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा नाही झाली,अतिवृष्टीचे अनुदान त्वरित खात्यात जमा करणे, पीकविम्याच्या नुकसानाची पाहणी करून तत्काळ मदत मिळावी, नियमित शेतकरी पिक कर्जदारांना शासनाचे प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

एपीआय गणपत काळुसे, पोलिस उपनिरीक्षक किशोर खंडार आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठांशी चर्चा करून नायब तहसीलदार उदय तुंडलवार, तालुका कृषी अधिकारी सुळे यांनी लिखित आश्वासन देत २१ ऑक्टोबरपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर शिवसैनिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.