
महागाव (जि. यवतमाळ) : नैसर्गिक आपत्तीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासन अतिवृष्टीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करून दिलासा देईल का, की सरकारी काम आणि वर्षभर थांब, हा प्रत्यय पुन्हा येईल, हा प्रश्न आहे. शेतकरी मेल्यावर त्याला मदत करणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी पुढाकार घेऊन नैसर्गिक आपत्तीचा मदत निधी आतापर्यंत वाटप होणे अपेक्षित होते; परंतु शेतकऱ्यांची कुणालाही काळजी नसल्याचेच दिसते.